अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी कालिदास सोनवणे

पुढील पंचवार्षिक कार्यकारिणीची निवड; संत सखुबाई प्रशाला येथे राष्ट्रीय बैठकीत निर्णय
पंढरपूर (प्रतिनिधी) लखन सोनवणे : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेची राष्ट्रीय बैठक रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दु. 3.00 वाजता पंढरपूर येथील संत सखुबाई प्रशाला या ठिकाणी उत्साहात पार पडली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव अवधूत, व राजेंद्र वनारसे अध्यक्ष अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना,यांच्या आदेशान्वये, पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय प्रवक्ते संभाजी खाडे अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत समाज संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सदस्य दिलीपराव पाचंगे होते. यावेळी पंढरपूर शहरासह तालुक्यातील गोंधळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पुढील पंचवार्षिक कालावधीसाठी विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये पंढरपूर शहराध्यक्षपदी प्रसिद्ध गोंधळी कलाकार कालिदास सोनवणे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी अमित गायकवाड, सचिवपदी महेश भिसे , सहसचिव कपिल भीरडीकर, कोषाध्यक्ष आनंद गायकवाड, तसेच तालुकाध्यक्ष सागर सावंत, कार्याध्यक्ष दिलीप उगाडे, महिला अध्यक्ष गीतांजली कदम, कार्याध्यक्ष वैष्णवी भिसे,यांची निवड करण्यात आली. सदर संघटनेच्या मीटिंगमध्ये गिरीधर शिंदे, मुकुंद मोरे, शरद गोरे, माजी शिक्षणाधिकारी जाधव, सागर सावंत, रामदास सावंत, विलास बहदुरे, दिलीप पांचगे, सचिन सावंत, दिलीप शिर्के, निलेश भिसे, पवन गायकवाड व सर्व समाज बहुसंख्येने उपस्थित होता. गोंधळी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित समाजबांधवांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form