सोलापूर, (प्रतिनिधी):- ज्येष्ठ संगितकार श्रीनिवासजी खळे यांचे जन्मशताब्दीचे वर्ष
सुरू असून त्याच निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि
वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्तविद्यमाने शनिवार दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी
6.25 वाजता लोकमान्य टिळक सभागृह (अॅम्फी थिएटर) चार हुतात्मा पुतळा समोर सोलापूर
येथे सूर काही राहिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रेणुका
महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली. सहा दशकाहून अधिककाळ मराठी
रसिकांना मोहिनी घालणारे ज्येष्ठ संगितकार श्रीनिवास खळे यांची जन्मशताब्दी सुरू
आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली अशा विविध भाषेमधील गीतांना स्वरबध्द
केले आहे. त्यांचे खरे आणि अधिक योगदान हे मराठी भावगीतांना आहे. त्याचबरोबर
त्यांनी बोलकी बाहुली, जिव्हाळा,पोरकी, पळसाला पाने तीन यासारख्या निवडक
चित्रपटासाठी संगीत दिले. पंडीत भीमसेन जोशी, लता मंगेशकर यांना सोबत घेवून त्यांनी
रामशाम गुणगान हे गीतसमूह संगीतबध्द केले होते. अशा प्रतिभावंत संगितकाराला
त्यांच्या गीतामधून आदरांजली अर्पण व्हावी या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा
दक्षिण सोलापूर आणि वेणुगोपाल संगीतालय यांच्या संयुक्तविद्यमाने सुगम संगीत या
कार्यक्रमातून सूर काही राहिले हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये रूपक
झंकार कुलकर्णी, पियुष आवारे, स्वरदा मोहोळकर, श्रावस्ती माळशिखरे, माऊली जोशी हे
गायक असून तबला झंकार कुलकर्णी, कौस्तुब चांगभले तर केदार गुळवणी हे व्हायोलीन आणि
बासरी जयेश कुलकर्णी हे वाद्य वाजवणार आहेत.संगीत संयोजन र्शवरी कुलकर्णी यांचे
असून निवेदन आदिती कुलकर्णी करणार आहेत. या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी आणि खळे
आण्णा प्रेमींनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.दीपक देशपांडे यांनी
केले आहे. .............................
