पंढरपूर प्रतिनिधी - पांडुरंग परिवाराचे श्रध्दास्थान कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक
यांच्या सहाव्या पुण्यस्मरण निमित्त कर्मयोगी प्रशासकीय भवन, वाखरी पंढरपूर येथे
विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रम सोमवार दि. १७/०८/२०२६
रोजी सकाळी ०९.३० ते ११.०० वा.रक्तदान शिबीर, तसेच ह.भ.प. जगनाथ महाराज देशमुख याचे
सुश्राव असे किर्तन सकाळी११.०० ते १२.०० वाजे पर्यंत होणार असुन दुपारी १२.०० ते
१२.३० दरम्यान पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली जाणार आहे.तसेच कर्मयोगी
सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.सा.का.लि.श्रीपूर व सर्व पांडुरंग परिवार यांच्या
वतीने दुपारी १२.३० ते २.०० यावेळेत सर्वासाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिवार युवा मंच, पंढरपूर यांच्या वतीने
11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी कर्मयोगी श्रद्धेय स्व.
सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण
भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच
सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शंकरराव साळवे नेत्र रुग्णालय,
सोलापूर (एच. व्ही. देसाई आय इन्स्टिट्यूटचा प्रकल्प)यांचे विशेष सहकार्यातून
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी व मदतनीस यांच्या मदतीने हे शिबिर घेतले जाणार
आहेत.ग्रामीण भागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा,
असे आवाहन प्रणव परिचारक यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्व. सुधाकरपंत परिचारक
यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृती जपत आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी
उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
