वाल्मीक कोळी हे दरोडे, लुटमार, करणारे लूट केलेली संपत्ती ते आपल्या प्रपंचात वापरत, हे आपणा सर्वांना माहीतच आहे, महर्षी नारद मुनींनी त्यांना या पापातून उत्तराई होण्यासाठी *राम नामाचे* महत्त्व सांगितले,
राम नामाने वाल्याचा महर्षी वाल्मिकी ऋषी झाले.
महर्षी वाल्मिक ऋषींनी राम जन्मा अगोदर रामायण लिहिले, त्याप्रमाणे भगवान विष्णू प्रभू रामचंद्र अवतारात लिहिल्याप्रमाणे चरित्र घडवावे लागले.
अनेक संतांनी नामाचे महत्त्व सांगितले.
नामाचे महत्त्व तुकाराम महाराजांचा अभंग......
*गोविंद गोविंद*
*मना लागलिया छंद*
*मग गोविंद ते काया*
*भेद नाही देवा तया*
*आनंदले मन*
*प्रेमे पाझरती लोचन*
*तुका म्हणे आळी*
*जेवी नुरेचि वेगळी*
जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अत्यंत आवडीचा हा अभंग नाम प्रकरणातील असून, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अत्यंत सुंदर असे नामाचे महत्त्व सांगितले आहे.
*अभंगाचा भावार्थ.....*
*जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग, मना लागलिया छंद या अभंगाची सुरूवात गोविंद गोविंद या शब्दाने सुरू होते*.
गोविंद हे भगवंताचे नाम, त्याच्या या नामाचा छंद आपणाला लागला पाहिजे, मनुष्याला एखाद्या अवयवाला इजा झाल्यानंतर शरीराची किंमत कळते, परंतु ज्याने हा करोडो रुपयांचा देह आपणाला दिला, त्याच्या नामाचा आपणाला विसर पडतो, त्याच्या नामाचा आपणाला छंद लागला पाहिजे, दिवस-रात्र परमेश्वराचे नाम मुखात पाहिजे, तुकाराम महाराजांना पांडुरंगाच्या नामाचा छंद लागला होता, ते सतत दिवस रात्र,उठता बसता पांडुरंगाचे नाम घेत, त्यांचे संपूर्ण शरीर भगवंताचे नाममय झाले होते, म्हणजेच नाम आणि भगवंत एक झाले होते, भगवंताचे नाम हेच सच्चिदानंद स्वरूप होय, *भगवंताच्या नामात जो स्वतःला विसरला, तो खरा जीवन मुक्त होय*
जगद्गुरु नामात स्वतःला विसरून जायचे, जगद्गुरु तुकारामची सासर वाडी, देहू नजीक लोहगाव, ते तिथे नेहमी कीर्तन करीत, त्यावेळेस आत्ताच्या कीर्तनासारखी डीजे, आकर्षक लाईट सुविधा, मंडप, असे काहीही नव्हते, मंदिरातील दगडी खांबांवर तेलाचा टेंबा लावला जात, तो सतत तेवत ठेवण्यासाठी त्यावर तेल घालणारी व्यक्ती असत, किर्तन बराच वेळ चालू असताना तेल संपले, टेंबा हळूहळू विजू लागला, मंदिरात अंधार पसरला, तुकाराम महाराज कीर्तनात तल्लीन झाले होते, अचानक त्यांच्या शरीरातून तेजोमय ऊर्जा संपूर्ण मंदिरात पसरली, मंदिरात लखलखाट झाला इतके ते नामात समरस झाले होते,
जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगातुन म्हणतात, नामाचा ध्यास लागला पाहिजे,
*कुंभारीन ज्याप्रमाणे वेलीवरील अळी उचलून खाण्याच्या निमित्ताने घरट्यात नेऊन ठेवते, कुंभारनीला सुईच्या टोका एवढी चोच असते, चोचीने ती त्या आळीला जसा वेळ मिळेल तसा टोच्या मारीत, अळी शांत पडलेली असते, ती मरण यातना भोगत असते, तिलाही सतत कुंभारणीचा ध्यास लागलेला असतो, की कुंभारीन येणार टोच मारणार, कुंभारीन येणार टोच मारणार, या सततच्या ध्यासाने अळीचे रूपांतर कुंभारणीमध्ये झाले,*
याचाच साधम्य अर्थ आपण सतत भगवंताचे नाम घेतले तर, आपले शरीरही भगवंतमय होईल.
भगवान राम सीता एकमेकांच्या ध्यासाने भगवान राम सीता झाली,
*एके दिवशी ज्ञानेश्वर माऊलींच्या कडे एक ब्राह्मण भिक्षुक साधक आला, व त्याने मला ध्यानही मिळावे अन् धनही मिळावे, अशी याचना केली,* माऊली थोडावेळ शांत बसले, आपल्यापेक्षा कितीतरी वयाने कमी, परंतु अधिकाराने जास्त असलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कडे त्या भिक्षुकाला त्यांनी पाठवले, की तू तुकाराम महाराजांना भेट, ते तुझी इच्छा पूर्ण करतील, ठरल्याप्रमाणे तो भिक्षुक देहू गावी तुकाराम महाराजांना शोधत शोधत आला, आणि माऊलींनी आपणाकडे मला पाठवले आहे, मला ध्यानही हवे, आणि धनही हवे,
त्याचे म्हणणे ऐकून जगद्गुरूंना आश्चर्य वाटले, माझ्यापेक्षा ज्ञानाने, अधिकाराने, वयाने श्रेष्ठ, त्यांनी भगवंताची आराधना सुरू केली आणि त्यांचे मार्गदर्शन घेतले,
याप्रमाणे त्या ब्राह्मण भिक्षुकाला बोलावले, *जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ११ अभंग व एक नारळ त्याच्या हातावर ठेवले, त्यावर तो ब्राह्मण हात झटकून म्हणाला, की मला ध्यान आणि धन हवे आहे, हे मला तुम्ही कशाला दिलेत, आणि ह्या अभंगाचे मी घेऊन काय करू, असे म्हणून त्याने ते अभंग व नारळ खाली ठेवून तेथून तो परत माऊलींकडे गेला,*
*तो प्रसंग शिवाजी महाराजांच्या दरबारात पाणी भरणारा, कोंडाजी यांने पाहिला, तो धावतच तुकाराम महाराजांच्या कडे आला, व खाली पडलेले अभंग व नारळ हे मला द्या, याचा मी मनाने स्वीकार करतो, याच अभंगाचे सतत स्मरण केल्याने, व ते आचरणात आणल्याने, पाणी भरणारा 'कोंडाजी' हा शिवाजी महाराजांच्या दरबारात एक निष्णात पंडित म्हणून त्याची महाराजांच्या दरबारात नेमणूक झाली.*
*भगवंताच्या सतत नामाने भगवंत आणि भक्त हे एकरूप होतात, मन आनंदित होते, आणि नकळतच डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात,* *शेवटच्या चरणातून जगद्गुरु म्हणतात भक्तीच्या प्रेमात भक्त आणि देव एकरूप होतात, एकमेकात लीन होतात.*
*मनुष्याने सतत भगवंताच्या नामात राहावे असा संदेश देतात.*
*जय जय राम कृष्ण हरी*🙏🏻
✒️
*श्री. रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण. जि. सातारा. फो. ९९७०७४९१७७*
