*आषाढी वारी कालावधीत अँटी ड्रोनगन चा वापर करणार - श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण*

सोलापूर प्रतिनिधी दिनांक 25 जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी सोहळा पार पडत असून यासाठी राज्यभरातून पालख्या, वारकरी पायी चालत पंढरपूर कडे येत असतात या पालखी सोहळ्याचे व पंढरपूर येथील वारी सोहळ्याचे चित्रण करण्यासाठी काही खाजगी ड्रोन आकाशात गिरट्या घालत असतात. या माध्यमातून वारकरी यांच्या जीवितस कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून यावर्षी माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून अँटी ड्रोन सिस्टम वापरण्यात येणार आहे. सदर सिस्टम कशा प्रकारे काम करते, त्याचे कार्य काय, त्याचा वापर कसा करावा याबाबत आज पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील परेड मैदानावर प्रात्यक्षिक करण्यात आले त्यावेळी माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी पोलीस खात्यात आवश्यक असणाऱ्या गोष्टीबाबत संबंधित यांना सूचना दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form