भाविक भक्त यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत
पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब आज आषाढी एकादशी वारीचा आढावा घेणेसाठी पंढरपूर मध्ये आले आसता पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रणिताताई भालके यांनी वारकरी भाविक भक्त यांना सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधीची मागणी केली असता या मागणीची उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घेत वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत विशेष अनुदान पंढरपूर नगर परिषदेस ₹५ कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामुळे देशभरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान असून, वर्षांमध्ये चार मोठ्या यात्रा भारतात त्यात आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्र वारी भरतात आषाढी वारी सर्वात मोठी असून सुमारे 30 लाख भाविक भक्त येत असतात. भाविक भक्त यांना चांगल्या सोई सुविधा बरोबर चंद्रभागा नदीपात्र व परिसराची स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मंजूर झालेल्या या निधीतून वारकरी यांना चांगल्या सुविधा पुरविणे, चंद्रभागा नदीपात्रातील गाळ, कचरा व इतर नदी परिसराची नियमित स्वच्छता, तसेच स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांनाही स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणाचा लाभ मिळणार आसल्याचे नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत,साईनाथ भाऊ अभंगराव, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके, माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळ मतदार संघाचे आमदार राजू खरे, पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक राहुल शिंदे नाईक, लोकेश यादव, विनायक देवमारे, सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे उपस्थित मान्यवर होते.
जनतेच्या व भाविकांच्या हिताचा विचार करून चंद्रभागा नदी ही महत्त्वपूर्ण मागणी मान्य केल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच या निर्णयामुळे पंढरपूरच्या स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या कामांना मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ₹५ कोटींचा निधी मंजूर झाले बद्दल नगराध्यक्षा प्रणिता ताई भालके यांनी आभार व्यक्त केले तसेच भाविक व नागरिक यांचेमधून समाधान व्यक्त होत्त आहे.
