पंढरपूर प्रतिनिधी - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात खिंडार पडले अनेक नेते, पदाधिकारी
व कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा झेंडा आपल्या
खांद्यावर आहे तसा ठेवून केवळ अजितदादा पवार यांच्याशी निष्ठा ठेवून त्यांच्या
विचारांवर कार्य करत भले कोणी सोबत असो अथवा नसो मात्र राष्ट्रवादीचा निष्ठावंत
मावळा म्हणून ज्यांनी पंढरपुरात कार्य करत असले तरी ओळख ही संपूर्ण महाराष्ट्रात
निर्माण केली असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत
शिंदे होय. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस
पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर
पहिल्यांदाच पंढरपूर दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी
सुनेत्राताई यांचे जंगी स्वागत पंढरपूर शहरातील के.बी.पी.कॉलेज चौकात केले. यावेळी
माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,
प्रदेश कार्यालयीन सरचिटणीस लतीफ भाई तांबोळी,विजय अभंगराव, अमोल परबतराव, अभिनव
श्रीकांत शिंदे, विकी अभंगराव, रशीद शेख , रफिक मुलाणी, सारंग महामुनी, प्रदीप
तांदळे, शुभम पवार, पंकज पवार, ऋषिकेश रायबान माऊली कुंभार,संतोष बंडगर, प्रशांत
परचंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. स्व.अजितदादा पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या
नेतृत्वाखाली काम सुरू करत अनेक महत्वाच्या विषयांवर आवाज उठविण्याचे काम त्यांनी
केले आहे. पंढरपुरात जंगी स्वागत केल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून
उत्साह संचारल्याचे पहायला मिळाले. पंढरपूर शहरासह येणाऱ्या प्रत्येक मार्गावर
सुनेत्राताई पवार यांचे भले मोठे फोटो असणारे बॅनर लावून त्यावर जोपर्यंत श्वास
तोपर्यंत निष्ठा माझी माऊली त्याग। धैर्य। समर्पण या डिजीटलवरील ओळीने त्यांचे
स्वागत करत अनेकांचे लक्ष श्रीकांत शिंदे यांनी वेधून घेतले.
