पंढरपूर प्रतिनिधी
*आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवस्ती (दसूर)शाळेची 'बालदिंडी' भक्तीचा झगा, सेवाभावाचा रंग आणि विठ्ठल नामाच्या गजरामध्ये एकता, समता, समानता ,संस्कृती,परंपरा आणि शिक्षणाचे महत्त्व यांचा सामाजिक संदेश देत अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.*
*विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेली विठुरायाची पालखी व विद्यार्थ्यांनी हातामध्ये सामाजिक संदेश घेतलेले बॅनर या पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य व प्रमुख आकर्षण ठरले.*
*या बालदिंडी सोहळ्यामध्ये गावातील ग्रामस्थ ,पालक सर्व विद्यार्थी , रामभक्त भजनी मंडळ दसुर व शाळेतील शिक्षक सहभागी झाले व अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा चव्हाणवस्ती(दसूर)शाळेचा बालदिंडी सोहळा संपन्न झाला*🙏🏻

