पंढरपूर (दि.10):- आषाढी यात्रेच्या अनुषंगाने शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता, जुना
दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास, हातविक्री करण्यास तसेच हॉटेल्स, स्टॉल्स
लावण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये प्रतिबंध
करण्यात आला असून, याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांनी जारी केले
आहेत. आषाढी एकादशी सोहळा 25 जुलै 2026 रोजी होणार असून, यात्रा कालावधी 15 ते 29
जुलै 2026 असा आहे. या सोहळ्याच्या कालावधीत लाखो भाविक श्री. विठ्ठल रुक्मिणीच्या
दर्शनासाठी व चंद्रभागा स्नानासाठी पंढरपूरला येतात. आषाढी एकादशीला येणारे भाविक
चंद्रभागा नदीपात्रालगतच असणा-या शेगाव दुमाला येथील भक्तीसागर (65एकर) येथे
वास्तव्यास असतात. त्यामुळे शेगाव दुमाला चौक ते तीन रस्ता या परिसरात भाविकांची
मोठया प्रमाणात गर्दी असते. आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक भक्तीसागर (65 एकर)
परिसरात वास्तव्यास असल्यामुळे सदरच्या ठिकाणी मोठया प्रमाणात दुकाने, हातविक्रेते,
तात्पुरती हॉटेल्स, स्टॉल्स लागतात. चंद्रभागा नदीपात्रातील दगडी पूल ते तीन
रस्त्यावर भाविकांची, वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी होवून अपघात होण्याची शक्यता
नाकारता येत नाही. त्यामुळे शेगाव दुमाला ते तीन रस्ता या परिसरात मोठ्या प्रमाणात
गर्दी होवून चेंगराचेंगरीसारखी घडू नये, यासाठी शेगाव दुमाला रस्ता ते तीन रस्ता,
जुना दगडी पूल या ठिकाणी दुकाने उभारण्यास, हातविक्री करण्यास तसेच हॉटेल्स,
स्टॉल्स लावण्यास मनाई करण्यात आली आहे सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर
कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 00000000000
