*हिमायतनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न--*

हिमायतनगर (दि. २९ एप्रिल) – (राम रत्नपारखी) राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात आणि मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र राज्यचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ‘समाजभूषण’ पुरस्कार डॉ. धर्मराज गोखले (माजी शिक्षण संचालक, कृषी विद्यापीठ, परभणी) यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांना पुढीलप्रमाणे पुरस्कार देण्यात आले – तालुका भूषण सटवाजी पवार, वैद्यकीय सेवा क्षेत्रात मारुती वाकोडे, तहसील प्रशासन सेवेसाठी तहसीलदार पल्लवी टेमकर, महसूल प्रशासन सेवेसाठी मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण, पोलीस प्रशासन सेवेसाठी पोलीस निरीक्षक अमोल भगत (हिमायतनगर), शैक्षणिक सेवेसाठी सत्यशील कुंडलवाडीकर, उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा वीरसनी, विधी सेवेसाठी अ‍ॅड. अतुल वानखेडे, कला व साहित्य क्षेत्रात त्रिरत्न कुमार भवरे, डिजिटल मीडियामध्ये गोविंद गोडसेलवार, प्रशासन सेवेसाठी पांडुरंग गायकवाड, ग्रामविकास प्रशासन सेवेसाठी अर्जुन जाधव, वनसेवेसाठी डी. डी. विभुते मॅडम आणि शैक्षणिक सेवेसाठी शिक्षणाधिकारी केशव मेकाले यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमात बोलताना केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी पत्रकारितेचे महत्त्व स्पष्ट करताना जबाबदार आणि सत्यनिष्ठ पत्रकारिता करण्याचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरणात रूपांतर करण्याचे आवाहन केले. राज्य संपर्क प्रमुख डॉ. बालाजी पेनुरकर यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर सखोल विचार मांडले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस निरीक्षक अमोल भगत, मंडळ अधिकारी बी. एम. चव्हाण तसेच राज्य मराठी पत्रकार परिषदेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये केंद्रीय संचालक राजकुमार बिर्ला, डॉ. अनिल सिरसाट, इंजिनिअर संदीप महाजन, मराठवाडा महासचिव प्रदीपकुमार जैन, संपर्क प्रमुख वैजनाथ भिसे, उज्वला गुरसुडकर, कीर्ती पांडे (जिल्हाध्यक्ष नांदेड), चंदा शर्मा (शहर अध्यक्ष नांदेड), मंजुषा भिसे (जिल्हा संपर्क प्रमुख), रामराव रत्नपारखे (तालुका अध्यक्ष, अहमदपूर) यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नांदेड जिल्हा अध्यक्ष देवानंद गुंडेकर सरसमकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष शुद्धोधन हानवते, जिल्हा उपाध्यक्ष राम चिंतलवाड, जिल्हा संघटक गंगाधर गायकवाड, तालुका सचिव सुभाष गुंडेकर, सहसंघटक प्रशांत राहुलवाड, तालुका अध्यक्ष अनिल नाईक, शहर अध्यक्ष यादव दत्ता येनेकर व उपाध्यक्ष सदाशिव पतंगे यांनी केले. एकंदरीत, राज्य मराठी पत्रकार परिषदेमार्फत आयोजित हा उपक्रम महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला असून, समाजातील विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा सन्मान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form