*जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्याचे जाधव डी. पी. उपविभागीय कृषी अधिकारी लातूर
यांचे आव्हान*.
लातूर - राम रत्नपारखी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अभियान स्वरूपात
राबविण्यात येणाऱ्या हवामान अनुकूल तंत्रज्ञान उपक्रमांतर्गत कृषी विभाग व पाणी
फाउंडेशनच्या सहकायनि एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन
करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील किमान ३० ते ४० शेतकऱ्यांनी यात ऑनलाइन सहभागी
व्हावे जाधव डी. पी. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे. पाणी फाउंडेशनद्वारे
संचलित डिजिटल शेतीशाळा हे एक ऑनलाइन व्यासपीठ असून, तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना
शास्त्रोक्त व पीकनिहाय उत्तम पद्धर्तीचे मार्गदर्शन झूम आणि यू-ट्यूबच्या
माध्यमातून दिले जाणार आहे. या शेतीशाळांमध्ये कृषी विभागांतर्गत सहायक कृषी
अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, अधिकारी, समूह सहाय्यक, कृषीताई व कृषी सखी सहभागी
होणार आहेत. प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी ४० ते ५० शेतकरी एकत्रित उपस्थित
राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. या डिजिटल शेतीशाळा नियोजित दिवशी सायंकाळी
७.३० वाजता सुरू होणार असून, त्याची लिंक गावनिहाय शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅपद्वारे
उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी लातूर कार्यालयाने
दिली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे सहायक कृषि अधिकारी यांचेशी संपर्क
साधावा. या शेतीशाळा चार भागांत आयोजन भाग १ (ता. १ एप्रिल) : पेरणीपूर्व
तंत्रज्ञान : बेड तयार करणे, बेडवर टोकण करणे, आंतरपीक पद्धत, बीज उगवण क्षमता
चाचणी व बीज प्रक्रिया. भाग २ (ता. ८ एप्रिल) : जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन
: बीजामृत, जिवामृत, घन जिवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क निर्मिती. भाग ३ (ता.
१५ एप्रिल) : एकात्मिक कीड व्यवस्थापन : सापळा पिके, पक्षिथांबे, चिकट सापळे, मित्र
कीटक, लिंबोळी व दशपर्णी अर्काचा वापर. भाग ४ (ता. २२ एप्रिल) : भात शेती लागवड
तंत्र : भाताची थेट पेरणी, श्री पद्धत व भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धती. चार विशेष
डिजिटल शेती शाळेचे आयोजन करण्यात आल्याची अशी माहिती तंत्रज्ञान समन्वय श्री
सुरेंद्र गंपले यांनी दिली आहे.
