*शांती ब्रह्म एकनाथ महाराज..*

*भागवत संप्रदायातील थोर संत कवी मराठी भाषेला विद्वानांची मान्यता मिळवून देणारे समतेचा पुरस्कार करणारे, सोळाव्या शतकातील महाराष्ट्रातील सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक, संत एकनाथ महाराज,* आईचे नाव रखुमाई, व वडिलांचे नाव सूर्यनारायण, हे पैठणचे लहानपणीच त्यांची आई एका वर्षातच निर्वतली, वयाच्या तिसऱ्या वर्षी वडील नाथांना सोडून गेले, त्यांचा सांभाळ आजी-आजोबांनी केला, *संतांचा जन्म आणि सामान्य जन्म फरक आहे*, आपणाला जन्माला यावे लागते, आणि संत जन्म घेतात. नाथांनी जन्म घेतला, तो वैष्णव कुळात अनाथांना कोणी त्राता उरला नाही, म्हणून नाथांचा जन्म झाला, असे भागवतात वर्णन केले आहे, संत अवतार का घेतात, हे नाथांनी एका अभंगात स्पष्ट केले आहे, *संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती* *धर्म रक्षणा कारणे साधू होता ती अवतीर्ण* *धर्माच्या रक्षणाकरता संत अवतीर्ण होतात,* चांगल्या मार्गाला लावणे, हेच संतांची कृती, संतांचे कार्य होय, जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु, या गुरु शिष्य जोडीने संपूर्ण भारतात भागवत धर्माचा प्रसार केला, नाथांनी संपूर्ण भागवत पाकृत मधून सांगण्यास सुरुवात केली. संत एकनाथ हे ज्ञानेश्वरी चे पहिले संपादक होते, कारण पैठणला आल्यानंतर नाथांचा घसा दुखू लागला, घशाला सूज आली, काही उपाय केल्या थांबेना, यावेळी नाथांना एक दृष्टांत झाला, ज्ञानेश्वरांनी समाधीनंतर २५० वर्षांनी स्वप्नात येऊन सांगितले, माझ्या घशाला अजान वृक्षाच्या मुळीचा वेढा पडला आहे, ती टोचत आहे, तरी तू ती काढून टाकावी. नाथ महाराज आळंदी ला गेले, त्यांना तेथील काहीही माहिती नव्हती, तेथे पूर्ण जंगल वाढलेले होते ,ज्ञानेश्वरांनी समाधी हुडकून काढली, त्यांनी समाधीच्या अंतर्भागात प्रवेश केला, तो खरेच अजान वृक्षाची मुळी ज्ञानेश्वरांच्या कंठापर्यंत वाढलेली त्यांना दिसून आली, नाथांनी ती मुळी काढून टाकली, जणू मराठीचे ज्ञान भांडारच खुले केले, ज्ञानेश्वरीत बरेच दोष आढळून येत होते, नाथांनी त्यातील शब्द शुद्ध करून त्याचा अभ्यास करून संशोधन करून शुद्ध स्वरूपात ज्ञानेश्वरी पाकृत केली, ही माऊलींच्या सांगण्यावरूनच. याशिवाय *गवळणी, अभंग, भारुडे, बहिरा, रोडगा, इत्यादी प्रकारचे विपुल लेखन एकनाथांनी केले*, नामस्मरण, चिंतन, भजन, कीर्तन, परोपकार, सदाचरण, अशा शुद्ध भक्ती मार्गाला लागावे, म्हणून त्यांनी बहुविध प्रकारचे साहित्य निर्माण केले. *लोकांना भक्तिमार्गाची आवड निर्माण व्हावी, म्हणून त्यांनी अनेक भारुडे रचली‌.* *विंचू चावला, विंचू चावला, बाई मी भोळी ग भोळी, दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला,* इत्यादी प्रकारच्या सुंदर गवळणींची रचना केली‌ आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर रविवार, फाल्गुन कृष्ण षष्ठी नाथांनी आपल्या गुरूंच्या पुण्यतिथीचा हा दिवस म्हणून मोठा उत्सव केला, सकाळीच पूजा वगैरे आटपून सर्व मंडळी सहभोजन केले. दुपारी नाथांनी दिंडीसह गोदावरी नदीच्या वाळवंटात प्रयाण केले, तेथे शेवटचेच कीर्तन केले, हरिनामाचा गजर करीत नाथांनी गोदावरी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतली, त्यांच्या गळ्यातील पुष्प माळा पाण्यात तरंगू लागल्या, गोदावरी नदीच्या पात्रातून नाथांचा देह वाळवंटात आणून मंत्रागणी देण्यात आला, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रचंड जनसमुदाय गोदामाईच्या काठावर जमला होता, ज्या ठिकाणी नाथांच्या देहाचे दहन केले होते, त्याच जागेवर एक पिंपळाचे रोप उगवून आले होते, तेथेच नाथांची समाधी बांधण्यात आली. याच *फाल्गुन कृष्ण षष्ठीला पंच परवा षष्ठी म्हणतात, कारण याच तिथीला नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामींना दत्त दर्शन झाले, नाथांची व जनार्दन स्वामींची भेट याच षष्ठीला झाली, तसेच श्री जनार्दन स्वामींचे व नाथ महाराजांचे निर्वाणही याच षष्ठीला झाले*, अनाथांच्या नाथांना वंदन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, *योगीराज गुणानाथ महाराज, हे नाथ संप्रदायातीलच , गुणानाथ महाराजांचे गुरु परमपूज्य गोपाळनाथ महाराज, त्रिपुटी जांब तालुका, सातारा, हेही नाथ संप्रदायातीलच, गोपाळनाथ महाराजांचे गुरु रंगनाथ महाराज, गोपाळनाथ महाराजांचे प्रतीक समाधीच्या ठिकाणी भोसलेवाडी ( सातारा ) येथे, नाथ षष्ठीचा मोठा उत्सवाची सुरुवात गोपाळनाथ महाराजांनीच केली आजही तेथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो, या कार्यक्रमाला परिसरातील वीस ते पंचवीस हजार भाविक उपस्थित राहत असून प्रसाद म्हणून वांग्याची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो यासाठी लागणारे भाजी भाकरी ही संपूर्ण गावातील महिला करत असतात*, *नाथ षष्ठी निमित्त त्यांना त्रिवार अभिवादन* 🙏🏻 *प्रकाशन पूर्व "योगीराज" पुस्तकातुन* ✒️ *श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण जि. सातारा फो‌ ९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form