पंढरपूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (उद्योग व व्यापार
विभाग) पंढरपूर तालुकाध्यक्षा सौ. सावली अतुल गायकवाड यांची सुस्ते गणातून पंचायत
समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार
सोहळा प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार
पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सौ. गायकवाड यांचा शाल, श्रीफळ आणि
पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. "सावली गायकवाड यांच्या निवडीमुळे उद्योग व व्यापार
विभागासह ग्रामीण भागातील प्रश्नांना अधिक बळ मिळेल," असा विश्वास व्यक्त करत फाटे
यांनी त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मान्यवरांची
उपस्थिती या कार्यक्रमाला पंढरपूर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी
उपस्थिती लावून नवनियुक्त पंचायत समिती सदस्यांचे अभिनंदन केले. योगेश ताड (संचालक,
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना) नवनाथ बचूटे (उद्योजक) भास्कर
गायकवाड (उद्योजक) ज्ञानेश्वर पवार निवृत्ती भटकर किशोर नपते शरद थिटे श्रीधर पिसे
यांच्यासह अन्य उपस्थित होते. आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सौ. सावली
गायकवाड यांनी, "पक्षार्पणामुळे मिळालेल्या या संधीचा उपयोग जनसेवेसाठी आणि सुस्ते
गणाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे करेन," असे प्रतिपादन केले.
