आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे हस्ते नूतन लोकनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार

आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे हस्ते नूतन लोकनिर्वाचित नगराध्यक्ष आनंद भाऊ माने उपनागराध्यक्ष अनिल इंगोले यांचा सत्कार संपन्न
सांगोला (वार्ताहर ):_आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था सांगोला यांचे वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नूतन नगराध्यक्ष आनंद भाऊ माने उप नगराध्यक्ष नितीन इंगोले तसेच गटनेते प्रशांत धनवजीर विरोधी पक्षनेते इंजिनीयर रमेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला तसेच नगरपालिका प्रशासन नेहमी सैनिकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवसाचे महत्त्व समजून सर्व आजी माजी सैनिकाचा सत्कार त्यांनी दिलेल्या *देश रक्षणाची सेवा याचा* यथोचित सत्कार केला जातो घरोघरी निमंत्रण पत्रिका पोहोचवून नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सुधीर गवळी हे कार्य मोठ्या निष्ठेने आणि जबाबदारपणे मुख्याधिकारी या नात्याने करत असतात हे लक्षात घेऊन यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form