प्रा. महादेव सुखदेव जेधे यांना समाज भुषण पुरस्काराने सन्मानित..

सोलापूर प्रतिनिधी- मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ व अखंड मराठी न्युज पंढरपूर यांच्या वतीने देण्यात येणारा राजमाता जिजाऊ मासाहेब राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने प्रा.महादेव सुखदेव जेधे यांना सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे शुभ हस्ते तसेच लेखिका व कवयित्री ललिता सबनीस, दैनिक एकमत सोलापूरचे संपादक संजय येऊलकर व प्रतिभा वानखेडे (अध्यक्ष, स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले. प्रा.महादेव जेधे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक तसेच शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सदरचा पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत त्यानां प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराचे आयोजन मानवतावादी बहुउद्देशीय मंडळ व अखंड मराठी न्यूज पंढरपूरचे प्रमुख सुरेखा भालेराव (नागटिळक)तसेच डॉ. राजेंद्र नागटिळक यांनी केले होते.या कार्यक्रमाच्याआयोजनाबद्दल नागटिळक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form