मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय स्वीय सहाय्यक अमोल पाटणकर यांचे बंधू
भाविन्य पाटणकर यांनी घेतले सूर्यनारायणाचे दर्शन
पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथे असणाऱ्या सूर्यनारायण देवाची यात्रा
मोठ्या उत्साहात सुरू असून ही यात्रा संपूर्ण महिनाभर चालते यात पौष महिन्यातील
प्रत्येक रविवारी येते संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत
असतात . येथील सूर्यनारायणाचे मंदिर अतिशय प्राचीन असून पुरातन हेमाडपंथी असे
दुर्मिळ मंदिर आहे. महाराष्ट्रातील एकमेव असे सूर्यनारायण देवाचे मंदिर आहे .आण्विक
पाटणकर हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी आले असता त्यांना या मंदिराची माहिती मिळताच
पाटणकर यांनी सूर्यनारायण मंदिरात जाऊन सूर्यनारायण देवाचे आशीर्वाद घेतले .यावेळी
त्यांनी संपूर्ण मंदिराविषयीची माहिती जाणून घेतली
यावेळी सूर्यनारायण देवस्थान
ट्रस्ट व ग्राम प्रशासनाच्या वतीने त्यांचा सत्कार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष
प्राध्यापक दत्तात्रय मस्के, व ग्रामपंचायतचे उपसरपंच गहिनीनाथ चव्हाण यांच्या
हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र किसान मोर्चाचे अध्यक्ष माऊली
हळणवर , भाजपा पंढरपूर तालुका सरचिटणीस विजयकुमार मोरे,महादेव केदारे, सचिन टिळेकर,
महेश धुमाळ, तंटामुक्त अध्यक्ष विजय कोळेकर,सौरभ लक्ष्मण धनवडे, युवक नेते पंकज
देवकते, वैजनाथ मस्के, माजी सरपंच नितीन मस्के,पत्रकार मारुती वाघमोडे, पत्रकार
तानाजी सुपकर, श्रीधर कोळेकर शिवाजी वसेकर, बाबासाहेब मुलांनी ,चंद्रकांत पाटील,
नारायण गुंड, रमेश नाझरकर, अमोल गुंड, साधू नलवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

