पंढरपूर प्रतिनिधी-
मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मराठी पत्रकार संघाच्या नूतन पंढरपूर कार्यकारणी निवडीबाबत येथील पत्रकार भवन येथे बैठक पार पडली.
यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी अपराजित सर्वगोड तर तालुका अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मिलिंद यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच
याप्रसंगी पत्रकारांच्या मराठी पत्रकार संघाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मीडिया टावर बाबत तसेच विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष अमोल माने,दगडु कांबळे, शहर सचिव दत्ता पाटील, शहर कार्याध्यक्ष रामकृष्ण बिडकर, शहर खजिनदार सचिन माने, शहर प्रसिद्धी प्रमुख कबिर देवकुळे यांची निवड करण्यात आली तर पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बालम मुलानी, तालुका कार्याध्यक्ष अमोल कुलकर्णी, तालुका सचिव अरुण जाधव, तालुका खजिनदार सावता जाधव, तालुका प्रसिद्धीप्रमुख विनोद पोतदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ शहापूरकर, पत्रकार कल्याण कुलकर्णी, विकास पवार, संजय कोकरे, राजेंद्र ढवळे, सागर आतकरे, नवनाथ खिलारे, अमोल गुरव, नेताजी शिंदे, संतोष चंदनशिवे, प्रकाश सरताळे, संतोष कसगावडे, संजय यादव, प्रदीप आसबे यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.