सोलापूर प्रतिनिधी -- श्री संत नरहरी सोनार समाज सेवा मंडळ,विजापूर रोड, सोलापूर
यांच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी सोनार, यांचा ७४० वा समाधी सोहळा
सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेच्या वतीने मित्ती माघ कृष्ण ३ शके १९४७ , बुधवार
दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्याचे योजिले आहे. सदर समाधी सोहळा कार्यक्रम बुधवार
दि. ४ फेब्रुवारी २०२६, रोजी असून, सकाळी ९ ते १० संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे
पुजन.. सकाळी १० ते १२ : गुलालाचे किर्तन ह.भ.प. श्री. शिवाजी महाराज पोतदार,व
ह.भ.प. श्री. हरीप्रसाद धर्माधिकारी , हे करणार आहेत. तर श्री विठ्ठल रुक्मिणी भजनी
मंडळ, शेळगी, यांच्यी त्यांना साथसंगत असणार आहे. दुपारी १२ ते १२.३० गुलाल,
पुष्पवृष्टी होईल. दुपारी १ ते ३ : महाप्रसाद असणार आहे . सदर कार्यक्रम सुंदर
मल्टीपर्पज हॉल, नेहरू नगर बस स्टॉप जवळ, विजापूर रोड, सोलापूर, येथे आयोजित
करण्यात आला असल्याचे , मंडळाचे अध्यक्ष व कार्यकारी सदस्य , यांनी कळविले आहे. तरी
सर्व समाजबांधवांना विनंती करण्यात येते की, सर्वानी या कार्यक्रमास उपस्थित राहून
कार्यक्रमाची शोभा वाढवावी , असे आवाहन , मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

