*मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान..!*
पंढरपूर प्रतिनिधी --
मशीन मध्ये क्वाईन टाका, कापडी बॅग घ्या..! असा उपक्रम गोपाळपूर ग्रामपंचायतीचा प्लॅस्टिकवर अनोखा उपाय राबविला आहे. मुख्यमंत्री समृद्ध समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्लास्टिक बंदीसाठी गोपाळपूर ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम ग्रामपंचायत मध्ये कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसवण्यात आली त्याचे उदघाटन यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी याचे हस्ते करणेत आले. गोपाळपूर येथे यशदा अंतर्गत सात प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी व पोलिस उप अधिक्षक निवासी आलेले आहेत.,त्यांचे उपस्थितीत आज यी उपक्रमाचे उदघाटन यशदाचे उप महासंचालक डाॅं मल्लीनाथ कलशेट्टी यांचे हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करणेत आले. यावेळी गोपाळपूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री पांडुरंग देवमारे ग्रामपंचायत अधिकारी ज्योती पाटील सदस्य उदय पवार, सविता आसबे व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशिक्षणार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
*प्लास्टिकवर नामी शक्कल…!*
मशीन मध्ये 5 रु कॉइन टाकले की बॅग टाकली कि कापडी बॅग मशीन मधून बाहेर येते. तिर्थक्षेत्र गोपाळपूर येथे भाविक व स्थानिक ग्रामस्थ यामुळे प्लास्टिक कचरा होतो तो आटोक्यात आणणेसाठी ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढविली आहे. गटविकास अधिकारी अमोल जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आषाढी कालावधीत सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते प्लास्टिक बाटली क्रश मशीनचे उदघाटन करणेत आले होते.
*प्लास्टिक वापर टाळा, कापडी बॅग चा पर्याय निवडा - डाॅ. मल्सिनाथ कलशेट्टी*
प्लास्टिक वापर टाळा, कापडी बॅग चा पर्याय निवडा असे आवाहन डाॅ. मल्सिनाथ कलशेट्टी यांनी ग्रामस्थांना केले आहे. गोपाळपूर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ही उपक्रम राबविला आहे. तौ कौतुकास्पद आहे. एखाद्या पॅचायत अधिकारी यांनी मनावर घेतले तर काय होऊ शकते या ग्रामपंचायती मध्ये राबविलेल्या विविघ उपक्रमा वरून दिसून येत असल्याचे डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी प्लास्टिक मुक्तीची शपथ सर्वाना दिली.
…………………..