"सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांची अवैध सुगंधी सुपारी मावा व्यवसायावर छापा

कारवाई करून ६ लाख ३४ हजर रूपयांचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर प्रतिनिधी-- 
आज ०८/१२/२०२५ रोजी  प्रशांत डगळे सोो, सहाय्यक पोलीस अधिक्षक (भा.पो.से.), पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांना मिळालेल्या बातमीनुसार अनिल नगर, पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात अवैध सुगंधी सुपारी मावा बनवण्याचा व्यवसाय चालु असल्याचे तसेच लाल रंगाचे स्विफ्ट कारमध्येही मोठया प्रमणात मावा असल्याचे मिळाले बातमीप्रमाणे छापा कारवाई कली आहे. सदर छापा कारवाईत इसम नामे १) विजय शिवाजी बामणे, रा.महाविर नगर, पंढरपूर, जि. सोलापूर, २) गणेश दत्तात्रय बागल, रा. अनिल नगर, पंढरपूर, जि. सोलापूर, ३) यश धनाजी पोरे, रा.अनिल नगर, पंढरपूर, जि. सोलापूर, ४) शंकर वसंत कुंदुरकर, रा.अनिल नगर, पंढरपूर, जि. सोलापूर, ५) राहुल कल्याण मोटे, रा. सेंट्रल नाका, पंढरपूर, जि. सोलापूर, ६) सुरज मिलनसिंग रजपूत, रा.पंढरपूर, असे सुरज मिलनसिंग रजपूत, रा.पंढरपूर हा त्याचे मालकीचे जागेत अनिल नगर, पंढरपूर येथे ३१ किलो सुका मावा किंमत ३१,०००/- रू. व ०३ किलो ओला मोवा किंमत ३०००/- रू. तसेच श्वेता हर्षित राठी, रा.पुणे यांचे नावे आरसी बुक असेलेली किंमत ६,००,०००/-억. ची स्विफट कार नं. MH 14 KS 8158 असा एकुण ६,३४,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य चे अन्न सुरक्षा अधिकारी श्री. चन्नवीर राजशेखर स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री. अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, (भा.पो.से.) सोलापूर ग्रामीण, मा. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, मा.श्री. प्रशांत डगळे सोो, सहाय्यक पोलीस अधिक्षक (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग, पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. हमीद शेख, पोहेकॉ/गोविंद कामतकर, पोहेकॉ/निलेश रोंगे, पोहेकॉ महेश कांबळे, पोकों/दिगंबर भंडारवाड, चापोकों/महेश गोडसे, पोकों/ राहुल लोंढे, पोकों/शिवशंकर हुलजंती यांनी पार पाडलेली आहे.

तरी पंढरपूर व परिसरातील नागरीकांना याव्दारे जाहिर अवाहन करण्यात येते की, आपले परिसरामध्ये अवैध धंदे निदर्शनास येत असल्यास तात्काळ आमचे कार्यालयास संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form