*चलो अकलूज चलो*,अकलूज सराफ सुवर्णकार संलग्न व्यवसाय व व्हॅल्युशन,व्यावसायिक मार्गदर्शन मेळावा

अकलूज प्रतिनिधी--
सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य,
माळशिरस तालुका समितीच्या वतीने 26 डिसेंबर 2025 रोजी अकलूज येथे कलम 411 bns कलम 317 विषयक कायदेशीर मार्गदर्शन तसेच जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार व्हॅल्युशन,व्यवसायिक मार्गदर्शक मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यामध्ये राज्याचे अध्यक्ष  उमेश शेठ बुऱ्हाडे व राज्याचे कायदे विषयक सल्लागार आणि कार्याध्यक्ष ॲड विशाल वेदपाठक यांचे मोलाचे मार्गदर्शन होणार आहे कार्यक्रमाचे उदघाट्न डी वाय एस पी  संतोष वाळके  यांची विशेष उपस्थिती मध्ये हा मेळावा साजरा होणार आहे तरी माळशिरस तालुका अध्यक्ष  बालाजी शेठ दीक्षित,सोलापूर जिल्हा अध्यक्ष गणेश शेठ मैड, आणि उपाध्यक्ष दिलीप सिद्धवाडकर  यांचेकडून सर्वांना उपस्थित आदी मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.

तरी सदर मेळाव्याला सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक सराफ सुवर्णकार संरक्षण समिती माळशिरस तालुका व सराफ असोसिएशन अकलूज यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form