२५ डिसेंबर रोजी कलापिनी संगीत महोत्सवाचे आयोजन-- प्रमुख पाहुणे आमदार श्री अभिजीत पाटील यांची उपस्थिती

पंढरपूर प्रतिनिधी -
कलापिनी संगीत विद्यालयातर्फे " कलापिनी संगीत महोत्सवाचे " आयोजन करण्यात आले आहे. यामधे कलापिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे  तबला,पखावज, गायन व वादन  इ चे सादरीकरण होइल. त्यानंतर युके देशातील येथील  प्रसिद्ध गायीका अस्मिता दिक्षीत यांचे शास्त्रीय गायन व अभंगवाणी कार्यक्रम होइल. 
त्यांना अविनाश पाटील( तबला), दादासाहेब नागणे( पखावज) ओंकार पाठक ( हार्मोनियम) हे साथ करतील. यावेळी आमदार श्री अभिजीत पाटील ,गुरु पंडीत दादासाहेब पाटील, तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर उपस्थित राहतील.हा कार्यक्रम दिनांक २५ डिसेंबर सकाळी ९ वा डी व्हि पी स्क्वेअर थिएटर, दुसरा मजला,के बी पी कॉलेज रोड येथे होइल. प्रवेश सर्वांना विनामूल्य आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form