.
माळशिरस प्रतिनिधी --
सोलापूर जिल्हा परिषद बांधकाम, उप विभाग माळशिरसच्या उप अभियंता पदाचा पदभार इस्माईल बाबुमियाँ मुलाणी यांच्या कडे मिळाल्याने अधिनस्त कार्यालयाकडील सर्व कर्मचारी वृंद यांचेकडून त्यांचा शाल, श्रीफळ देऊन तसेच पेढे भरवून यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी जि. प. बांधकाम उप विभाग माळशिरस जमीर तांबोळी (शेख), धन्यकुमार काळे, राजाजी वाघंबरे, अंकुश थोरात, अर्जुन बोडरे, बापूराव माने, श्रीमंत मिसाळ, रसूल मुलाणी, नंदा भोकटे, स्वाती साळवे आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते. सदरचा सत्कार समारंभ अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.