पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नामदेव पायरी येथे श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी निघालेल्या पदयात्रेमध्ये सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे,माजी आमदार प्रशांत परिचारक, आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्यासह हजारो शहर भाजपा व विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होते.
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे देण्यात आली आहे.भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शामल शिरसट व ३६ नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पदयात्राकाढण्यात आली होती नागरिक, भाजपा व मित्र पक्षाचे पदाधिकारी,
कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याचे दिसून आले. मोठ्या शक्ती प्रदर्शन करत भाजपने आज प्रचाराचा शुभारंभ केला.
*पंढरपूर भाजपा नगराध्यक्ष व ३६ नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ* --
शुक्रवारी सकाळी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष व ३६ नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला पंढरपूर हे आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र म्हणून विकसित व्हावे तसेच पंढरपूर शहरातील नागरिकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात साठी भाजपा सरकार संपूर्ण मदत करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शन करत तसेच भाजपा व मित्र पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते