सोलापूर प्रतिनिधी --
सोनार समाजाच्या आर्थिक विकासासाठी राज्य शासनाकडून श्री. संत नरहरी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. दि. 18 ऑक्टोबर रोजी सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष मी वसंत पोतदार स्वतः,उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार व सचिव दत्तगुरु वेदपाठक मिळून महामंडळाच्या कार्यालयास भेट दिली असता चर्चेच्या वेळी जिल्ह्यातून कर्ज मागणीसाठी एकही अर्ज आले नसल्याचे कळाले. सोनार समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे. व्यवसायामध्ये उभारी घेता यावी यासाठी ही योजना महामंडळामार्फत राबविण्यात येत आहे.
*पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय सोनार समाज स्नेह मेळावा व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा 2025 कार्यक्रमात वरील सर्व शासन योजनाची सविस्तर आणि सखोल माहिती समाज बांधवाना व्हावी म्हणून संबंधित खात्याचे अधिकारी, अग्रणी बँकेचे अधिकारी या सर्वाना पाचारण करण्यात येणार आहे*.कांही माहिती आवश्यक असल्यास संपर्क श्री दत्तगुरु वेदपाठक, सचिव 80874 21025.
_______________________________________
विविध कर्ज योजना आहेत. त्यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घ्यावा. कर्ज रक्कमेवरील व्याज महामंडळंमार्फत देण्यात येते.कर्ज मिळत नाही, बँका आपल्याला कर्ज देत नाही म्हणून निराश होऊ नका. आणि बँका कर्ज देत नाही अशा अफवावर विश्वास ठेऊ नका. अर्जदारांनी थेट बँक मॅनेजरशी संपर्क साधावा. बँकानी नवं उद्योजकानाही कर्ज द्यावे असे शासनाच्या बँकाना सूचना आहेत. अनेकदा नवीन उद्योजकाकडे चांगला सिबिल स्कोअर नसतो. कारण त्यांनी यापूर्वी कोणतेही कर्ज घेतलेले नसते. अशा परिस्तिथीतीत ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देणेबाबत सोनार समाज संस्थेमार्फत शासनास पत्रव्यवहार केलेला आहे.
याशिवाय 2 ) पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना 3) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम निर्मिती योजना 4) प्राधामंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजना सुवर्णकांरासाठी आहेत. श्री.नरहरी आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सात रस्ता, डॉ. परळे दवाखान्यासमोर, सोलापूर येथे असून वरील अनुक्रमांक 2, 3, 4 या योजना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत आहेत. सदरचे कार्यालय होटगी रोड, किल्लेदार मंगल कार्यालयाजवळ, अग्रसेन भुवन मंगल कार्यालयासमोर आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजना सोलापुरात ही राबविण्यात येत आहे. साडे तीन लाखात पैकी एक लाख शासनच भरते.तीन रूमचा फ्लॅट मिळतो. याचाही लाभ गरजूनी घेणेबाबत विचार करावा. याबाबत संस्थेच्या संपर्कात जे जे समाज बांधव आले त्यांना सांगितले पण सांगितलेल्या बांधवापैकी कोणीच लाभ घेतला नाही. याबद्दल खंत वाटते.