पंढरपूर प्रतिनिधी--
मराठी पत्रकार संघाच्या वतीने पंढरपूर पत्रकार भवन गांधी चौक येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.तसेच 26/11 मुंबई येथील हल्यात शहीद पोलिस बांधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्याच प्रमाणे सकाळी 11:30 वाजता पंढरपूर पत्रकार भवन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले संविधान वाचन व शपथ घेण्यात आली.तसेच त्यावेळी २६/११मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यामध्ये शहीद पोलिस बांधव व नागरिक त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मराठी पत्रकार संघ, पंढरपूरचे हरिभाऊ प्रक्षाळे, राजेंद्र ढवळे,अपराजित सर्वगोड, विनोद पोतदार,दत्ता पाटील, संतोष चंदनशिवे, ज्ञानेश्वर शिंदे, कल्याण कुलकर्णी,राजु बाबर, अमोल गुरव, समाधान वनसाळे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते