पंढरपुरात परिचारक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावरच नागरिकांचा विश्वास

भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट यांच्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान अवताडे मैदानात
पंढरपूर प्रतिनिधी-- 
पंढरपूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यात थेट लढत होत आहे. 
गेली अनेक वर्षांपासून पालिकेवर वर्चस्व असणाऱ्या पांडुरंग परिवाराने भाजपा उमेदवार शामल शिरसट यांच्या विजयासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, युवक नेते प्रणव परिचारक  हे निवडणूक मैदानात उतरली असून त्यांच्या प्रचार केलेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

 २०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि शहर विकास आघाडीने शहरातील नागरिकांना दिलेला वचननामा पूर्ण केल्याचा दावा माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केला आहे. 
मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर शहरात भाजपा सरकारच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांवर आणि पुढील विकासाचे व्हिजन पंढरपूरकर नागरिकांसमोर मांडले जात आहे. मात्र विरोधकांकडून विकासावर न बोलता परिचारक हटाव अशी द्वेषाची भावना जपली जात असल्याचा टोला भालके यांना माजी आमदार परिचारक यांनी लगावला.
भाजपाच्या निवडणुक प्रचार रॅलीला मिळणाऱ्या प्रतिसादावरून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर नागरिकांचा विश्वास कायम  असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. 

पंढरपूर नगरपालिकेवर मागील चार दशकांपासून पांडुरंग परिवाराचे वर्चस्व आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या माजी आमदार स्वर्गीय सुधाकरपंच परिचारक यांनी मागील काही वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी सोबत काम करण्याची भूमिका घेतल्यामुळे या भागात भाजपाचे प्राबल्य वाढले आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास कायम आहे.
नगरपालिकेत अनेक वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी भाजपा शहराध्यक्ष, नगरसेवक विक्रम शिरसट यांनी केलेल्या कामाच्या जोरावर परिचारक यांनी या निवडणुकीत शामल शिरसट यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील आणि याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form