भारतीय जनता पार्टी,पंढरपूर शहरच्या वतीने इच्छुक उमेदवारांना अर्ज उपलब्ध
पंढरपूर प्रतिनिधी --
राज्यात गेल्या 4 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर 4 नोव्हेंबर रोजी जाहिर झाला आहे. त्यानुसार राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.10 नोव्हेंबर पासून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील 8 दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहेत.
त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी, पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथे उपलब्ध होणार आहेत.
🕙 अर्ज उपलब्ध वेळ:
दि. 09 नोव्हेंबर व 10 नोव्हेंबर 2025
सकाळी 10.00 ते 1.00 व सायंकाळी 3.00 ते 7.00
🕙 अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ:
10 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 7.00 वा.
इच्छुक उमेदवारांनी वरील वेळेत भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथून अर्जाचा फॉर्म घेऊन तो पूर्ण भरून सादर करावा.
सदर माहिती पत्रकार परिषदेत शहर अध्यक्ष लाला पालकर, अक्षय वाडेकर, सुभाष मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
पंढरपूर शहर