पंढरपूर प्रतिनिधी:- (संतोष कांबळे)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील राजकीय चित्र रंगू लागले आहे. रोपळे जिल्हा परिषद गट क्रमांक ३१ ही जागा अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने या गटातून कोण उमेदवार रिंगणात उतरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर सौ. उषा आशोक पाटोळे यांनी उमेदवारी दाखल करावी, अशी चर्चा मतदारसंघात जोमाने सुरू आहे.
समाजकार्याची पायाभरणी
या भागात समाजसेवेच्या माध्यमातून ओळख निर्माण केलेले समाजसेवक आशोक रामचंद्र पाटोळे हे जनतेचे प्रश्न सोडविण्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.
घरकुल योजना, निराधार महिलांचे प्रश्न, गाई-शेळी व शिलाई मशीन योजनेत सहाय्य, तसेच गरीब व शेतकरी वर्गासाठी शासकीय योजना मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत.स्थानिक पातळीवर वरिष्ठ नेते व अधिकाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून विकासकामांना गती देण्याची त्यांची वृत्ती जनतेत लोकप्रिय ठरली आहे.
महिला सक्षमीकरणाचा ध्यास
सौ. उषा पाटोळे या याआधी पंचायत समिती निवडणुकीत उतरल्याने त्यांना राजकीय अनुभव असून, त्यांचा महिलांमध्ये चांगला संपर्क आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली रोपळे गटात महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहे समाजसेवक आशोक पाटोळे यांची विकासाभिमुख ओळख
सौ. उषा पाटोळे यांच्या उमेदवारीची मतदारांकडून जोरदार मागणी,शेतकरी, महिला व युवकवर्गात चांगला जनसंपर्क,स्वच्छ, पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्वाची अपेक्षा जनतेचा विश्वास विकासाच्या दिशेने पाऊल
स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या उमेदवारी
विषयी मतदारवर्ग सकारात्मक असून, सौ. उषा पाटोळे या रोपळे जि.प. गटात विकासाची नवी दिशा देणाऱ्या लोकाभिमुख नेत्या ठरतील, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
Tags
राजकीय वार्ता