सोलापूर प्रतिनिधी --
राज्यातील सराफ, सुवर्णकार व्यवसायिकाकडून चोरीची, संशयित मालमत्ता जप्त करताना पोलिसांकडून नाहक त्रास व्हायचा. तो त्रास थांबवावा म्हणून राज्यातील सराफ, सुवर्णकारांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती. त्यानुसार माननीय मुख्यमंत्री तथा गृह मंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सराफ सुवर्णकारांचे होणारे हाल, त्रास लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक विचार करून महाराष्ट्र राज्यातील सराफ सुवर्णकारांच्या सुरक्षा विषयक समस्यांचे निराकारण करण्यासाठी, अडचणींची सोडवणूक करण्यासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन केले असून त्याबाबतचे परिपत्रक ही निर्गमित केले आहे.
त्याबद्दल सोलापूर जिल्हा सोनार समाज संस्था सोलापूर चे अग्रणी प्रवर्तक तथा सराफ सर्वश्री मोहनराव मंद्रूपकर,संजयजी मैंदर्गीकर, संतोषशेठ कळमणकर अध्यक्ष वसंत पोतदार उपाध्यक्ष विजयकुमार पोतदार, सचिव दत्तगुरु वेदपाठक,सह सचिव गिरीश जमखंडीकर, खजिनदार गजानन सोनार, संचालक इंजि.विजयकुमार पोतदार, इंजि. रुद्रप्पा डोदमनी, प्रा.डॉ.अमर दीक्षित, सौं. चित्रा पोतदार यांनी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, गृह राज्य मंत्री पंकजजी भोयर साहेब,ऑल इंडिया ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल आणि याबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे कर्तव्यदक्ष आमदार सौं. चित्राताई वाघ मॅडम यांचे आभार मानले आहेत.
या समितीचे अध्यक्ष मा.विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था )मुंबई,उपाध्यक्ष पोलीस महासंचालक यांचे विधी सल्लागार म.रा.मुंबई, सदस्य सचिव पोलीस अधीक्षक, राज्य पोलीस नियंत्रण कक्ष म. रा. मुंबई आणि सदस्य म्हणून सर्वश्री नितीन खंडेलवाल जि. अकोला, राजेश रोकडे जि. नागपूर, राजेश खरोटे जि. अकोला, सुधाकर टाक जि.नांदेड, किरण अंदीलकर जि. पुणे, महावीर गांधी जि. सोलापूर, भरत ओसवाल जि. कोल्हापूर, सुभाष वडाला ( जैन ) मुंबई, गिरीश देवरमनी जि. सोलापूर, अजीत पेंदूरकर मुंबई, राजेंद्र दिंडोरकर जि. नासिक, अमोल ढोमणे जि. वर्धा आदींचा समावेश आहे.
Tags
सामाजिक वार्ता