राष्ट्रवादीच्या वतीने महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल सोनिया कागदे यांचा सन्मान

पंढरपूर/प्रतिनिधी
 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने सोनिया शरद कागदे यांची नाशिक येथे महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उमेश फाटे, शरद कागदे, डॉ. मानसी नागेश फाटे, रामहरी कागदे, हनुमंत कागदे, बाळासाहेब कागदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे म्हणाले की पुढील काळात परिसरातील विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विराजमान झाले पाहिजे. सोनिया कागदे यांनी शिक्षणाच्या जोरावर मिळवलेल्या यशाचा आदर्श सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन यश संपादन करावे असे आवाहन करत त्यांनी सोनिया कागदे यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form