सोलापूर येथे स.स. बाळकृष्ण महाराज अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन ...

पंढरपूर प्रतिनिधी --
देवसागर साधक समाज इंचगिरी सांप्रदाय सोलापूर यांच्या वतीने श्री समर्थ सद्‌‌गुरु बाळकृष्ण महाराज यांच्या साधकां तर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन कार्तिक शुध्द १० शके १९४७ कार्तिक शुक्ल १२ म्हणजेच दिनांक १ नोव्हेंबर २०२५ ते ३ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत श्री कालिका देवी मंदिर, शुक्रवार पेठ, सोलापूर करण्यात आले आहे .

समस्त भक्त भाविकांना कळविण्यास आनंद वाटतो की प्रतिवर्षाप्रमाणे अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री. स. स. बाळकृष्ण महाराज यांच्या सोलापूर साधकांतर्फे श्री चा हरिनाम सप्ताह शनिवार दि. १/११/२०२५ ते सोमवार दि. ३/११/२०२५ पर्यंत संपन्न होणार आहे. सदरचे सोहळ्याला श्री क्षेत्र नंदेश्वर येथील सदगुरु माऊलीचे गुरुभक्तीचे स्फूर्तीस्थान श्री सद्‌गुरु बाळासाहेब महाराज, नंदेश्वर यांचे शनिवार दिनांक १/११/२०२५ रोजी आगमन होत आहे.तसेच दररोज रोज पहाटे ५ वा. काकड आरती सकाळी ७ वा.पूजा,प्रवचन,भजन,भागवत वाचन व ध्यान व बारा अभंग, हरिजागर अशी कार्यक्रमाची रूपरेषा असुन सर्व माऊली भक्तांनी अखंड हरिनाम  सोहळ्यात यावे व आपला पारमार्थिक आनंद द्विगुणित करा असे आवाहन संयोजकांनी केले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form