पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याची अवैध सुगंधी तंबाखू वाहतूकीवर कारवाई...

चार आरोपी विरुद्ध,गुन्हा दाखल एकूण १४ लाखाचा मुद्देमाल जप्त...
पंढरपूर प्रतिनिधी --
 दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक  प्रशांत डगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेनऊ वाजता पंढरपूर वरून लक्ष्मी टाकळी रोड कडे जाणारा टेम्पो क्रमांक एम एच १३ डी क्यू १९५८ हा संशयास्पदरीत्या जात असताना त्यास लक्ष्मी टाकळी रोड येथे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली गुटखा तयार करण्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखू एकूण ३० पोत्यामध्ये भरलेली ते उघडून तपासणी केली असता एका पाकीट ची किंमत हजार रुपये असे एकूण ३० पोते भरलेली सुगंधी तंबाखू एकूण किंमत रुपये नऊ लाख रुपये व टेम्पोचे किंमत पाच लाख रुपये असा एकूण १४ लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून ताब्यामध्ये घेतला आहे 

सदर प्रकरणी एकूण वाहन चालक सुनील गावडे वय ३० वर्ष राहणार मोहोळ मालक सुनील दादा वसंत मोरे राहणार मोहोळ गणेश पंडित राहणार पंढरपूर तुकाराम माळी यांची नावे निष्पन्न झाली असून यांच्याविरुद्ध अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे भुसे यांनी तक्रार नोंदवली आहे त्यावरून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे अन्न व औषधी अधिनियम कायद्याप्रमाणे व बी एन एस कलम ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे , यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुक्याचे पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,पोलीस उपनिरीक्षक हमीद शेख, पीएसआय विक्रम वडणे, पोलीस हवालदार निलेश रोंगे, पोलीस हवालदार महेश कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनायक नलावडे, संतोष गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल विनोद शिंदे, राहुल लोंढे, हुलजंती यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form