पंढरपूर शहर व परिसरात पावसाची संततधार...
पंढरपूर प्रतिनिधी --
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंढरपुर शहरातील सर्वच रस्त्यावर पाणी साचलेले दिसून आले आषाढी वारी पासून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि पावसामुळे त्यात आणखी भर पडली आहे पंढरपूर शहरातील मेन शिवाजी चौक,संभाजी चौक येथे अनेक मोठमोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यात पाणी साठल्यानंतर खड्डा कळत नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात झालेले आहेत तर पाणी वाहून जाण्यासाठी केलेले ड्रेनेजच्या जाळ्या पूर्ण चोकअप झालेले आहेत त्यामुळे पाणी जाळीतून जाणे ऐवजी रस्त्यावर साठून राहते त्यामुळे पंढरपूर शहरात नागरिकांचे हाल होताना दिसत असुन अनेक नागरिक वस्ती, झोपडपट्टी भागात पावसामुळे घरात, दुकानात पाणी शिरले आहे.
काल रात्रीपासून सोलापूरचा हवामान खात्याने पावसाचा रिझल्ट जारी केला होता त्या अनुषंगाने पंढरपूर शहरात पावसाने हजेरी लावली व संपूर्ण पंढरपूरला व भोसले चौक परिसर, शहरातील विविध भागातील झोपडपट्टी तसेच प्रताप नगर प्रतिभाताई परिचारक नगर, लक्ष्मी टाकळी कडे जाणारा मेन रोड अर्बन बँकेच्या समोर रस्त्याची दुर्दशा झाली आहे आदी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहिवाशांचे नागरिकांचे व्यापाऱ्यांचे हाल होत आहेत तसेच ड्रेनेज मधून येणारी घाण पाणी व गटारी मधून वाहणारी घाण पाणी रस्त्यावर साचलेले असून आरोग्याच्या बाबतीत धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे यासाठी योग्य त्या उपाययोजना करून संबंधित प्रशासन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी योग्य ते नियोजन करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे
Tags
सामाजिक वार्ता