सोलापूर प्रतिनिधी --
सोलापूर शहरातील नांव लौकिक असलेली श्री. कालिका नागरी सहकारी पत संस्थेची 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पत संस्थेचे जेष्ठ संचालक वसंत पोतदार यांच्या अध्यक्षते खाली उत्साहात पार पडली.
यावेळी स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांतजी वेदपाठक अक्कलकोट हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तसेच संस्थेचे चेअरमन अमोल दीक्षित,व्हाईस चेअरमन प्रकाश तपासे,तज्ञ् संचालक संतोष कळमणकर,संजय मैंदर्गीकर,मोहन मंद्रूपकर,सचिव सचिन आष्टीकर,ऑडिटर प्रकाश कांबळे,संचालक प्रसाद चोळचगूड,अनील टंकसाली,पांचाळ सोनार समाज संस्थेचे जिल्हाअध्यक्ष निलेश धाराशिवकर,सुनील पंडित,सुधाकर शहाणे, ऑडिटर शेंडगे साहेब, वसुली अधिकारी सौं.हिप्परगी मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश तपासे यांनी केले. विषय,अंदाजपत्रक, ताळेबंद, नफा तोटा पत्रक वाचन संस्थेचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत जिंद्दम यांनी केले. चंद्रकांत वेदपाठक यांनी मार्गदर्शन केले.सोलापूर मधील ज्या पत संस्था कार्यरत आहे त्यात कालिका पतसंस्थेचा समावेश होतो. ही आनंदाची बाब आहे,संस्थेचे कामकाज चांगले चालले आहे. केंद्राच्या सहकार कायद्याची अंमलबजावणी होत आहे.सर्व संचालक संस्थेच्या उन्नती साठी निरपेक्षपणे कार्यरत आहेत.असे सांगून,केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ सोनार समाज बांधवानी घ्यावा असे सांगितले.
जेष्ठ संचालक व आजचे सभेचे अध्यक्ष वसंत पोतदार यांना त्यांच्या सामाजिक सेवेची नोंद घेऊन आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा हृद सत्कार माजी चेअरमन मोहन मंद्रूपकर यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.प्रमुख अतिथी चंद्रकांत वेदपाठक यांचा सत्कार चेअरमन अमोल दीक्षित यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.सभासद विवेक नाईकवाडी, गिरीश शहाणे, अमोल गवासाने, सतीश तुळजापूरकर, वंदन निंबाळे, आदि बहुसंख्येने हजर होते.सचिन आष्टीकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले अशाप्रकारे पतसंस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहात पार पडली.
Tags
सामाजिक वार्ता