सिंहगड पंढरपूरच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात "रेव्हीट फॉर इंजिनीअर्स" या विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : प्रतिनिधी--
एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी (पंढरपूर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी "रेव्हीट फॉर इंजिनीअर्स – टर्निंग आयडियाज इनटु इंटेलिजेंट मॉडेल्स" या विषयावर साप्ताहिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

या कार्यशाळेत कॅडडेस्क, बालाजीनगर, पुणे चे संचालक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. पराग देशमुख यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर व बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक "Revit" सॉफ्टवेअरची ओळख करून देणे व प्रत्यक्ष कामगिरीसाठी त्यांना सिद्ध करणे हा होता.
कार्यशाळेमध्ये तज्ञ मार्गदर्शक श्री. पराग देशमुख सयांनी "Revit" सॉफ्टवेअरचे विविध उपयोग, बीम प्रणाली, डिजिटलीकरणाच्या प्रक्रियेतील योगदान व स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात त्याचा वापर याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षण सत्रादरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सॉफ्टवेअरवर काम करण्याची संधी मिळाली, जे त्यांच्या व्यावसायिक कौशल्यांच्या वाढीस उपयुक्त ठरणारे आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातील करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या डिजिटल कौशल्यांची पायाभरणी झाली आहे, असे विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी सांगितले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले असून, अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही घेण्यात यावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती.  कार्यशाळेत एकूण ६० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 
या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या प्रकल्पाधारित शिक्षण या संकल्पनेतून, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम व अधिष्ठाता डॉ. चेतन पिसे तसेच उपप्राचार्य डॉ.स्वांनद कुलकर्णी  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते अशी माहिती या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. गणेश लकडे यांनी दिली.

कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. मिलिंद तोंडसे, प्रा. शेखर पाटील तसेच विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form