सोलापूर प्रतिनिधी --
सोनार समाजातील व्यक्ती, कुटुंब, आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयं रोजगाराला चालना देण्याच्या उद्देश्याने श्री. संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने केली. महामंडळाचे कामकाजाला आता सुरुवात झाल्याचे समजल्यामुळे मी वसंत पोतदार अध्यक्ष व गजानन सोनार खजिनदार,सोनार समाज संस्था सोलापूर आम्ही दोघांनी मिळून महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे यांची आज भेट घेतली. त्यांनी सखोल, सविस्तर माहिती दिली. सोनार समाज बांधवाच्या माहितीसाठी महामंडळ कर्ज योजनेची माहिती खालील प्रमाणे देत आहे.
सोनार समाजाच्या विकासासाठी खालील विविध योजनांचा समावेश केलेला आहे.
*20 % बीज भांडवल योजना* --ही योजना राष्ट्रीयकृत बँका व डी. सी. सी. बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येते. महामंडळाचा सहभाग 20 %, लाभार्थी सहभाग 5 %, बँक सहभाग 75 % असतो. प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाख इतका आहे. व्याज दर 6% असून परतफेड कालावधी 5 वर्षें आहे. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षें आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. एक लाख पर्यंत.
*रू. एक लाख पर्यंत थेट कर्ज योजना* --
अर्जदाराचे वय 18 ते 55. सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी रू एक लाख. लाभार्थी सहभाग कांही नाही. नियमित समान 48 मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रू. 2,085 / - परत फेड करणाऱ्या लाभार्थ्याला व्याज भरावे लागणार नाही. तथापी थकीत हप्त्यावर द. सा. द. शे. 4 % व्याजदर आकारण्यात येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रू. पंधरा लाख पर्यंतची कर्ज योजना --
ओ. बी. सी. प्रवर्गातील गरजू, कुशल व्यक्तीला कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघु उद्योग, मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र ई. व्यवसाया करिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे. महामंडळाच्या पोर्टलवर नांव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.बँके मार्फत लाभार्थीना रू. पंधरा लाख पर्यंत कर्ज वितरित केले जाईल. कर्ज हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम 12 % च्या मर्यादेत व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात लाभार्थीच्या आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येईल. लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरु असल्याचे किमान दोन फोटो अप लोड करावेत. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षें असावे. वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख पर्यंत.
गट कर्ज व्याज परतावा योजना ---
महामंडळाच्या निकषानुसार विहित केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवाराचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी अधिनियम 2013 अंतर्गत एल एल पी, एफ पी ओ अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँके तर्फे स्वयं रोजगार, उद्योग उभारणी करिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा बँक प्रमाणिकरणा नुसार महामंडळाकडून अदा केला जाईल. गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास जास्तीतजास्त 12 % व्याज दाराच्या आणि रू. पंधरा लाख मर्यादेत एकूण व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. इतर कोणतेही चार्जेस, फीस महामंडळ अदा करणार नाही. गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. गटातील लाभार्थ्यांचे वय 18 ते 45 वर्षें असावे. गटातील उमेदवाराने अर्ज करते वेळी या प्रकल्पा साठी व यापूर्वी महामंडळाच्या अथवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा वैयक्तिक लाभ घेतलेला नसावा. गटाच्या भागीदाराचे किमान रू 500 कोटीच्या वर ठेवी असलेल्या व कोअर बँकिंग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत / शेड्युल्ड बँकेत खाते असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 इतका असावा. गटातील उमेदवारांनी महामंडळाच्या अधिकृत वेब पोर्टलवर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
अर्जदार लाभार्थीची अर्हता --
अर्जदार ओ बी सी आणि महाराष्ट्र रहिवासी असावा. तो कोणत्याही बँक, महामंडळ,वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. बीज भांडवल योजना व थेट कर्ज योजनेकरिता शहरी, ग्रामीण अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न एक लाख रू. पेक्षा कमी असावे. कुटुंबातील एका व्यक्तीस एकाच योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने निवडलेल्या व्यवसायाचे त्याला ज्ञान, अनुभव असावा.
*अर्जासोबत जोडावयाची कागद पत्रे*---
उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्राच्या साक्षान्कीत प्रती, जातींचे प्रमाण पत्र, शिधापत्रिका प्रमाणित प्रत, आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, व्यवसाय स्थळाची भाडे पावती, करारनामा, 7 / 12 उतारा, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जन्म तारखेचा दाखला, दोन जामीनदाराचे हमी पत्र अथवा गहाण खत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेंच ज्या प्रयोजनेसाठी कर्ज मंजूर होणार आहे त्यासाठीच त्याचा उपयोग करण्याबाबतचे अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र, तांत्रिक व्यवसायाकरिता आवश्यक असतील असे परवाने / लायसन्स, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व लागणारा कच्चा माल, यंत्र सामुग्री ई. चे दरपत्रक, महामंडळाच्या संचालक मंडळाने निर्देशीत केल्यानुसार इतर कागदपत्रे, अर्जदाराने अर्जासोबत मूळ प्रमाणपत्र न जोडता त्याच्या साक्षान्कीत प्रती जोडावेत.
*शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना*-
उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत, अंतर राष्ट्रीय अभ्यास क्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इतर मागास प्रवर्गातील विध्यार्थी, विध्यार्थिनींना बँके मार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे. उच्च शिक्षणासाठी बँके कडून राज्य व देशांतर्गत रू. 10 लाख, परदेशी अभ्यास क्रमासाठी रू. 20 लाख इतके महतम कर्ज अदा करण्यात येईल. विध्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षें असावे व तो ईमाव प्रवर्गातील महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराची ग्रामीण व शहरी भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा शासनाच्या सक्षम प्राधिकरणाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या नॉन क्रिमिलेअर मर्यादित असावी. अर्जदार ई. 12 वी 60 % गुणांसह उत्तीर्ण असावा.
*राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रम* -
आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन अभ्यासक्रम, कृषी, अन्न प्रक्रिया व पशु विज्ञान. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विध्यार्थ्याकरिता बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जामध्ये शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च याचा समावेश राहील.
*परदेशी अभ्यासक्रम* -
आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, विज्ञान, कला, यामध्ये प्रवेश घेतलेल्याना बँकेने उपलब्ध करून दिलेल्या कर्जा मध्ये फक्त शैक्षणिक शुल्क, पुस्तके, साहित्य खरेदीचा समावेश राहील.
*कौशल्य विकास प्रशिक्षण योजना* --
समाजातील परंपरागत व्यवसायाचे आधुनिकीकरण झालेले असल्यामुळे त्या परंपरागत व्यवसायात कार्यरत असलेल्या तसेच इतर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या ओ बी सी पात्र व्यक्तींना आधुनिक प्रशिक्षणा चा लाभ व्हावा तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून त्यांना कौशल्यपूर्ण बनविणे व त्याद्वारे रोजगार किंवा स्वयं रोजगार उपलब्ध करून देणे. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षें. शिक्षण ई. 10 वी. महामंडळाच्या / MSSD च्या वेब पोर्टलवर उमेदवाराने नोंदणी करणे अनिवार्य आहे. जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे आठ लाख रू. पर्यंतचे प्रमाणपत्र. वय, रहिवाशी दाखला, आधार कार्ड अप लोड करावे लागेल. स्किल इंडिया पोर्टल वर नोंदणी केलेल्या प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात येईल. संपूर्ण प्रशिक्षण हे महामंडळामार्फत देण्यात येईल.
*महिला स्वयं सिद्धी व्याज परतावा योजना* --समाजातील गरीब, होतकरू, परित्यक्ता महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, महिला बचत गटातील किंवा ओबीसी प्रवर्गातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगाकरिता बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या रू. 5 ते 10 लाख पर्यंतच्या कर्ज रकमेवरील 12 % व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येईल. सदर योजना महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोक संचालित साधन केंद्र ( CMRC ) च्या साहाय्याने राबविण्यात येणार आहे. व्याज परतावा योजनेचा लाभ महामंडळा कडून घेता येईल. ओबीसी 50% महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटास रू. 5 लाखापर्यंत कर्ज बँकेकडून उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येईल. प्रथम टप्प्यातील कर्ज नियमित परत फेडींनंतर सदर बचत गट द्वितीय टप्प्यात रू. 10 लाख पर्यंत कर्ज बँकेकडून मंजूर करून घेण्यास पात्र होईल. Lol द्वारे बँकेने मंजूर केलेल्या आणि नियमित कर्ज परत फेड केलेल्या बचत गटास 12 % पर्यंतच्या व्याज मर्यादेत व्याज परतावा बँकेच्या प्रामाणिकरणानुसार मिळेल. महिला बचत गटातील महिला ओबीसी व महाराष्ट्र रहिवाशी असावी. वय वर्षें 18 ते 60 असावे.
*महामंडळाच्या योजनातर्गत सुरु करता येण्यासारखे व्यवसाय*.--
कुक्कुट पालन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, ऑल्यूमिनियम फॅब्रिक शॉप, ऑटो स्पेअर पार्टस, पुस्तकं दुकान, फळं, भाजीपाला विक्री दुकान, जनरल स्टोअर्स, हार्ड वेअर व पेंट शॉप, लाकडी वस्तू बनविणे, वीट भट्टी, टेलरिंग युनिट, वास्तू विशारद व्यवसाय, ग्लास व फोटोफ्रेम सेंटर, कापडं दुकान, दवाखाना, अभियांत्रिकी सल्ला केंद्र, हॉटेल व्यवसाय, औषधं दुकान ई. तसेच या शिवाय इतर कोणतेही कायदेशीर व्यवसाय.तरी पात्र सोनार बांधवानी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. सोलापूर येथे महामंडळाचे कामकाज सुरु झाले आहे त्याचप्रमाणे महामंडळाचे कामकाज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु झाले आहे. सोनार हा पारंपारिक सोन्या चांदीचे दागिने करणारा कारागीर आहे. या कारागीरांची स्थिती सध्या फार वाईट आहे. या कारागीरा कडे भांडवल नसल्याने तो स्वतःचा व्यवसाय करू शकत नाही .सोने व चांदीचे भाव वाढल्याने त्यातील गुंतवणूक देखील वाढली आहे. त्यामुळे भांडवल दारांच्या हातात हा व्यवसाय आहे. त्यांच्याकडुन कारागिराना पुरेशी मजुरी मिळत नाही. व्यवसायासाठी भांडवल नाही. मजुरी अपुरी या कोंडीत सापडलेल्या सोनार समाजाला आता न्याय मिळण्याची अपेक्षा वाटते. तरी सोलापूर जिल्ह्यातील ईच्छुक सोनार कारागीर बांधव, भगिनींनी अधिक माहितीसाठी सोलापूर जिल्हा व्यवस्थापक श्रीमती वृषाली लहारे मॅडम व निरीक्षक श्री शिवशंभो साहेब , द्वारा महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, सात रस्ता सोलापूर यांना थेट जाऊन कार्यालयीन वेळेत भेट घेऊन तुमच्या प्रकल्प बाबत अधिक माहिती घेऊन लाभ घ्यावा. राज्यातील ईतर जिल्यातील बांधवानी त्यांच्या जिल्हा व्यवस्थापक यांचेसी संपर्क साधून लाभ घ्यावा ही विनंती.
वसंत पोतदार, अध्यक्ष,
सोनार समाज संस्था ( महाराष्ट्र राज्य ), सोलापूर जिल्हा सोलापूर
मोबाईल 94230 65915
--------------------------------------------
महाराष्ट्र शासनाने सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलेले आहे. या योजनेतून सोनार काम, सराफी व्यवसाय, शेती व्यवसाय, शिक्षण,उद्योग धंदे तसेच महिला बचत गट, तरुणांनी कौशल्य विकास आदि योजनेचा लाभ घ्यावा जेणे करून रोजगार निर्मिती होऊन सोनार समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास साधला जाईल.
मोहन मंद्रूपकर, अग्रणी प्रवर्तक,
सोनार समाज संस्था.
Tags
सामाजिक वार्ता