नारळी पौर्णिमा निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीमातेस अलंकार परिधान...

पंढरपूर दि. 08 :-
 नारळी पौर्णिमे निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, मोठ्या दंडपेट्या जोड, हि-याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा तुरा, लहान व मोठा शिरपेच, मत्स्य जोड, मोठी बोरमाळ, लक्ष्मीहार, तोडे जोड, मोहनमाळ, तुळशीची माळ  तसेच श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र सुभेदार यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form