पंढरीत सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिटरूम बार असोसिएशनची बैठक संपन्न

सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिटरूम बार असोसिएशनच्या जिल्हाअध्यक्षपदी सुभाष भोसले यांची निवड 
पंढरपूर/प्रतिनिधी --
पंढरपूर येथे सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिटरूम बार असोसिएशनची बैठक येथील सद्गुरु मंगल कार्यालय येथे पार पडली. या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील परमिटरूम बार चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन परमिटरूम बार असोसिएशनचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सुरज भोसले, भैय्यासाहेब महाडिक यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी सोलापूर ग्रामीण परमिटरूम बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीत व्हॅट संपूर्ण माप करण्यात यावा, जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा, दरवर्षी होणारी लायसन फी वाढ थांबवण्यात यावी, बियरबार प्रमाणे देशी मद्य विक्री करण्यास परमिटरूम बार चालकांना परवानगी देण्यात यावी, लायसन फीची आकारणी समप्रमाणात असावी.या मागण्या बैठकीत करण्यात आल्या.याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास लायसन रिन्यूअल करणार नसल्याचा इशारा  सोलापूर जिल्हा परमिटबार असोसिएशनच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी ढाबे व इतर ठिकाणी कोणताही कर न भरता एमआरपीप्रमाणे अवैद्यरित्या दारू विक्री केली जात आहे. मात्र परमिटरूम बार चालकांना मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असल्याने सरकारच्या या करवाढ धोरणामुळे परमिटरूम बार व्यवसाय धोक्यात आल्याने परमिटरूम बार चालकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांकडून एकत्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला.
लवकरच वरील मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार, उत्पादन शुल्क कमिशनर मुंबई, जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा पोलीस अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, याचबरोबर पंढरपूर येथील उत्पादन शुल्क कार्यालयाला निवेदन देण्यात येणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सुभाष भोसले यांनी सांगितले. 

यावेळी व्यासपीठावर संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष कैलास गौड, सोलापूर शहराध्यक्ष इंदापूरे, महाराष्ट्र मध्ये विक्री संघटनेचे सातारा कार्याध्यक्ष सचिन बेलगोडे, संजय पाटील टेंभुर्णी, सचिन सेहगल, काकासाहेब जगदाळे माळशिरस, अभिजीत राऊत बार्शी, आकाश लोंढे माढा, संजय क्षीरसागर मोहोळ, कैलास फड करमाळा, सतीश कोंडभेरे मंगळवेढा, सय्यद शेख सांगोला, गणेशाचारी वैराग, राहुल देशमुख वेळापूर, पंढरपूर तालुका सचिव सतीश भोसले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष दयानंद बाबर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सुरज भोसले यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form