श्री क्षेत्र पखालपूर गणपती दर्शनासाठी बसेस सोडण्यात येणार- ग्राहक पंचायतीच्या मागणीला यश.... पंढरपूर- पखालपुर प्रत्येक चतुर्थी दिवशी

पंढरपूर प्रतिनिधी- 
श्री क्षेत्र पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी बस सोडव्यात अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पंढरपूर आगार प्रमुखाकडे केली होती त्यानुसार चतुर्थी दिवशी बसेस सोडण्याची मागणी आगार प्रमुखांनी मान्य केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. 
पंढरपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर *श्री क्षेत्र पखालपूर येथे प्राचीन,जागृत असे गणपतीचे मंदिर* आहे. नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा आहे.त्याठिकाणी *प्रत्येक महिन्यात चतुर्थी दिवशी* दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.हे विचारात घेऊन येथील आगार प्रमुख योगेश लिंगायत  यांनी प्रत्येक चतुर्थी दिवशी बसफेऱ्या करण्यात येतील असे सांगितले. 
त्यामुळे  *अनेक वर्षांपासून प्रत्येक "चतुर्थी" दिवशी तेथे जाण्या-येण्यासाठी बंद  झालेली एसटी ची सेवा पुन्हा सुरू* सकरण्यात येणार आहे .*मंगळवार दि.१२/८/२०२५ रोजी अंगारकी चतुर्थी च्या मुहुर्तावर सकाळी आठ पासून रात्री पर्यंत पखालपूर येथे जाण्या-येण्यासाठी बससेवा सुरू करण्यात येत आहे* या *वर्षातील हा एकमेव योग* आहे त्यामुळे तेथे जाण्या-येण्यासाठी भाविकांची मोठी सोय होणार असल्याने सर्वसामान्य भाविक,जेष्ठ नागरिक,महिलांनी आनंद व्यक्त केला आहे. तरी प्रवाशी  भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानक प्रमुख अंकुश सरगर, सहा.वाहतुक निरिक्षक नवनाथ दळवे,आढीवचे माजी सरपंच दिनकर दाजी चव्हाण, गुरसाळेचे सरपंच दीपक शिंदे,ग्राहक पंचायतीचे प्रांत सहसचिव दीपक इरकल,जिल्हा पालक सुभाष सरदेशमुख, जिल्हा सचिव सुहास निकते,जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर, संतोष उपाध्ये तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,जिल्हा सदस्य अण्णा ऐतवाडकर,पांडुरंग अल्लापूरकर, संतोष उपाध्ये,तालुका सदस्य सागर शिंदे,सतिश निपाणकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form