आमदार अभिजीत (आबा) पाटील यांच्या ४२ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर
१५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
पंढरपूर, दि.०१ :
श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील साहेब यांचे ४२ व्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल सह. साखर कारखाना, अक्षय ब्लड बँक सोलापूर व पंढरपूर ब्लड बैंक, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन पंढरपूरचे बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते तसेच कुमारी शितल चाटे वन परिक्षेत्र अधिकारी, सुर्यकांत मोरे तालुका कृषी अधिकारी व सागर भोसले सहाय्यक कृषी अधिकारी व कारखान्याचे संचालक यांचे शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर प्रसंगी १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक करताना कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्केसर म्हणाले की, सत्कार समितीचे वतीने कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वीं विविध समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून आज रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आरोग्याच्या बाबतीत समाजामध्ये प्रबोधन होणेसाठी आरोग्य विषयक वर्षभर विविध शिबीरे आयोजित केले जातात. रक्तदान हे भक्तीचा व सेवेचा मार्ग असून सर्वांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सदर प्रसंगी पंढरपूरचे बालरोग तज्ञ, डॉ. श्रीकांत देवकते बोलताना म्हणाले की, संकटे आली तेंव्हाच अवतार घेतला जातो, श्री विठ्ठल कारखाना संकटात असताना आमदार अभिजीत (आबा) पाटील यांनी कारखाना वाचवून शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांना जीवदान दिले व थोड्याच कालावधीमध्ये सर्वांना आपलेसे करुन अपार कष्ट घेवून माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार होऊन विधानसभा गाजवित आहेत, संकटाला तोंड देवून अडचणीतून मार्ग काढणेची फार मोठी क्षमता आमदार अभिजीतआबा पाटील यांचेमध्ये आहे, वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देवून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आभार प्रदर्शन करताना कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री डी. आर. गायकवाड म्हणाले की, सत्कार समितीचे वतीने कारखान्याचे चेअरमन, आमदार श्री अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजपयोगी कार्यक्रम साजरे केले जातात. रक्तदान ही एक सेवा असून, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचतात यासाठी कर्मचारी यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करुन उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कारखान्याचे लिगल ऑफिसर श्री ओमकार अवधुत यांनी केले.
सदर कार्यक्रमास अक्षय ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी अजय रुपनर व पंढरपूर ब्लड बँकेचे जनसंबर्क अधिकारी शुभम घोंगे, कारखान्याचे संचालक सर्वश्री सुरेश भुसे, सचिन वाघाटे, प्रविण कोळेकर, सिध्देश्वर बंडगर, दशरथ जाधव, अशोक तोंडले, विठ्ठल रणदिवे, महेश खटके, दिपक सदाबसे व कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.बी. पाटील, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, ठेकेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता