*भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणाऱ्या कृति आराखड्यासंदर्भात*
कोपरगाव (प्रतिनिधी) - नाशिकरोड
येथील *सकल भारतीय सोनार समाज संघटन* या सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाचे माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या भारतीय विवाहसंस्थेला बळकटी देणाऱ्या विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणणाऱ्या कृति आराखड्यासंदर्भात रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता *सहविचार बैठक* आयोजित करण्यात आली आहे. ही सहविचार बैठक अहिर सुवर्णकार भवन, सराफ बाजार, कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर येथे होणार आहे.
या सहविचार बैठकीस अधिकाधिक सर्व शाखीय सोनार समाजातील ज्येष्ठ दाम्पत्य, मध्यमवयीन दाम्पत्य, नवविवाहित दाम्पत्य, उपवर समाज बांधव आणि भगिनी तसेच त्यांचे पालक, शाखीय तसेच सर्व शाखीय सोनार वधु वर परिचय मेळावा आयोजक संस्थांचे पदाधिकारी, शाखीय तसेच सर्व शाखीय सोनार सामुदायिक विवाहसोहळा आयोजक संस्थांचे पदाधिकारी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून सहविचार बैठकीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोपरगाव येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाशशेट वाघ, माजी अध्यक्ष श्री. भाऊसाहेब बागुल, सामाजिक कार्यकर्ते श्री. योगेशभाऊ बागुल, कोपरगाव येथील लाड सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रकाशशेट भडकवाडे, लाड सोनार युवक मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोषशेट देवळालीकर, युनिव्हर्सल विश्वकर्मा वंशज फाउंडेशन इंटरनॅशनलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. शांताराम गोपाळशेट दुसाने, दैवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य (अकोला) चे अध्यक्ष श्री. दिलीपराव महतकर, अखिल देशस्थ दैवज्ञ सोनार संस्था महाराष्ट्र प्रांतिक मंडळाचे अध्यक्ष श्री. नंदकिशोर फाकटकर, कोषाध्यक्ष श्री. सुरेंद्र खोल, अखिल वैश्य सोनार महासंघाचे महासचिव श्री. संदीप भगीरथशेट सराफ,भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. भास्करराव मैंद, नाशिक जिल्हा माळवी सोनार समाजचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र शेरेकर, श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था (महाराष्ट्र राज्य), श्री क्षेत्र त्रंबकेश्वर, जि. नाशिक चे अध्यक्ष श्री. दिलीपशेट शहाणे घोटीकर, हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन (आर आर बी फाउंडेशन संलग्नित), अमळनेर (जिल्हा जळगाव) चे संस्थापक अध्यक्ष श्री. भैयाभाऊ भामरे, नाशिक येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक ॲड. स्वप्निल सुधाकर विसपुते, पुणे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्रा चे जिल्हा समन्वयक ॲड. जगदीश बी. विसपुते, धुळे येथील सोनार, सोनी, स्वर्णकार समाज विधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक ॲड. डॉ राजेंद्र निकुंभ, सहसमन्वयक ॲड. अमित मधुकर दुसाने, सकल भारतीय सोनार समाज संघटनचे ग्रुप ॲडमिन श्री. धनंजय कपोते, श्री. सुनील माळवे (वावी), पुणे येथील वंशावळी डॉट कॉमचे संस्थापक संचालक श्री. विकास शांताराम विसपुते, सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक मिलिंदकुमार सोनार आदींनी केले आहे.
या सहविचार बैठकीत सोनार समाजातील विवाहविषयक समस्या, विवाहनिश्चितीच्या, घटस्फोटाचे वाढते प्रमाण या समस्यांची सामूहिक प्रयत्नांतून सोडवणूक करण्यासाठी भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणारा हा कृति आराखडा कसा महत्त्वपूर्ण असून, त्याची अंमलबजावणी करणे ही काळाची अनिवार्य गरज का आहे, यावर विचारमंथन करण्यात येणार आहे.
Tags
सामाजिक वार्ता