पंढरपूर प्रतिनिधी-
माऊली फाऊंडेशन काळबादेवी मुंबई संस्थेच्या माध्यमातून चालू वर्षी २०२५ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर एकूण तीन टप्प्यांत वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा व अन्नदान वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या वतीने पहिला टप्पा सासवड ते तरडगांव.. केवळ वैद्यकीय सेवा देण्यात आलीत,दुसरा टप्पा फलटण ते वेळापूर या टप्प्यात फलटण, बरड, नातेपुते व वेळापूर या ठिकाणी संस्थेमार्फत अन्नदानासह वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे.तर तिसरा टप्पा वेळापूर नंतर भंडीशेगांव येथे पालखी मार्गावर तर पंढरपूर येथे श्री संत सेना महाराज मंदिर,मठात वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.
या सर्व वैद्यकीय शिबिरातून आजारी वारकऱ्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे दिली जातात तसेच त्यांच्या हाता पायांना मालिश करणे, जखमेवर मलमपट्टी करणे, डोळ्यात औषध घालणे इत्यादी सेवा दिल्या जातात.सन २०२५ च्या आषाढी वारी सेवा शिबिरांचे माध्यमातून सुमारे दीड लाख वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा तर सुमारे ४५/५० हजार वारकऱ्यांना महाप्रसादाचे ( अन्नदान) वाटप करण्यात आले आहे. तर सेवा शिबिराची सांगता दि. ४.७.२०२५ रोजी श्री संत सेना महाराज मठ, पंढरपूर येथील वैद्यकीय शिबिराने झाली. याप्रसंगी शिबिरात मठामध्ये राहण्यास आलेल्या स्त्री पुरुष वारकऱ्यांनी तपासणी व मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. शैलेश शेलार, डॉ. शिंदे मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष रमेश लांबे, भालेराव, सदस्य नंदलाल पवार, दिलीप पवार, अरुण घोडके ई. यांनी शिबिर मठाचे पदाधिकारी यांच्या मदतीने शिबिर यशस्वी सांगता करण्यात आले.
Tags
सामाजिक वार्ता