स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या *पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी प्रविण सुरवसे तर शहर अध्यक्ष पदी रवी सोनार* यांची नियुक्ती जाहीर...


 सोलापूर प्रतिनिधी--
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या *पंढरपूर तालुका अध्यक्ष पदी प्रवीण ज्ञानेश्वर सुरवसे तर शहर अध्यक्ष पदी रवी वसंत सोनार* यांची फेरनियुक्ती  स्वराज माहिती अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी जाहीर केल्याने पंढरपूर परिसरात त्यांचे स्वागत होत आहे.
     स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. दीपक कांबळे, संस्थापक महासचिव कमलेश शेवाळे ( देवा सर ), प्रदेश अध्यक्षा सौ. धनश्री उत्पात,  विश्वस्त उमेश काशीकर, प. महा. अध्यक्ष श्रीराम बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी ही नियुक्ती जाहीर केली.
    प्रविण सुरवसे व रवी सोनार यांच्या निवडीचे स्वराज्य जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, जिल्हा प्रभारी इफ्तेकार कामतीकर,पहिले जिल्हा उपाध्यक्ष सत्तू भोसले दुसरे जिल्हा उपाध्यक्ष शुक्राचार्य ढवण, सचिव सुधाकर शहाणे सह आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form