स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या **सोलापूर जिल्ह्यात 41 दिवसात 41 नव्या पदाधिकाऱ्यांची रेकॉर्ड ब्रेक नियुक्ती** जाहीर !!

 *संपूर्ण सोलापूर जिल्हा स्वराज्य मय* !!
 नूतन जिल्हा अध्यक्ष *चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या कार्याचे वरिष्ठाकडून अभिनंदन* !!
अक्कलकोट प्रतिनिधी --
स्वराज्य माहिती अधिकार संघटनेचे नूतन *सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक*  यांनी ठाणे येथील वर्धापन दिनी जिल्हा अध्यक्ष पद स्वीकारताना दिलेले अभिवचन पूर्ण करत *प्रत्येक दिवशी एक या प्रमाणे 41 दिवसात 41 नव्या विविध क्षेत्रातील समाजसेवकांना स्वराज्य मध्ये आणत त्यांना विविध पदावर समाज कार्य करण्याची संधी देत, नियुक्ती केल्याने संपूर्ण सोलापूर *जिल्हा स्वराज्य मय झाले, या *रेकॉर्ड ब्रेक कार्यामुळे* स्वराज्य चे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेदपाठक यांचे *अभिनंदन* केले आहे.
    
     *स्वराज्य पोलीस मित्र , पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्री उत्पात यांच्या नेतृत्वाखाली* व सर्व *विश्वस्त, संचालक* मंडळाच्या मार्गदर्शनाखाली एक जून रोजी ठाणे येथे स्वराज्य वर्धापन दिन संपन्न झाल्यानंतर  2 जून ते 13 जुलै 2025 अश्या 41 दिवसाच्या कालावधीत *सोलापूर जिल्ह्यात नूतन जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांनी जिल्ह्यातील 11 तालुक्यात 11अध्यक्ष व 11 शहरात 11 अध्यक्ष आणि सोलापुर जिल्हा विभागात पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य अशी एकूण 41 दिवसात 41 समाजसेवकांची नियुक्ती केली आहे* यात *डॉक्टर, वकील, शिक्षक, विविध पदावरील अधिकारी, व्यापारी, व्यवसायिक, पत्रकार,धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी, निवृत्त पोलीस अधिकारी, विमा अधिकारी, सुवर्णकार, सराफ*  अश्या समाज सेवकांना स्वराज मध्ये आणत त्यांना विविध पदावर नियुक्ती करत संपूर्ण *सोलापूर जिल्हा स्वराज्यमय*  केल्याने जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक  यांचे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्या मुळेच *स्वराज्य  शीर्ष नेतृत्व वेदपाठक यांचे अभिनंदन* केले आहे व करीत आहेत.
       संपूर्ण सोलापूर जिल्हा स्वराज्यमय करण्यामध्ये *जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पंडित, सचिव सुधाकर शहाणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अशोक मैंदर्गीकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रकुमार रघोजी, पंढरपूर शहर प्रसिद्दी प्रमुख विनोद पोतदार, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष संतोष दीक्षित, अक्कलकोट तालुका अध्यक्ष सूर्यकांत कडबगावकर, जिल्हा कार्य. सदस्य किशोर बेजगम, अमोल शहाणे* आदींनी विषेश परिश्रम घेतले.
     जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा वेदपाठक यांच्या या सामाजिक क्षेत्रातील जबरदस्त कार्याचे इतरांनी अनुकरण करावे  अशी भावना अनेक स्वराज्य पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. आणि वेदपाठक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form