पंढरपूर प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीने व्यापारी आघाडी प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य या पदावर काशिनाथ पोतदार यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना याबाबतचे पत्र देऊन वीरेंद्र कुकरेजा प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी महाराष्ट्र यांनी निवड जाहीर केली आहे.
समाजसेवक,उद्योजक,काशिनाथ गणपत पोतदार हे मुळ अक्कलकोट येथील रहिवासी असून भारतीय जनता पार्टीत 1989 पासून तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून कार्य करत होते, ते सामाजिक व राजकारणात क्षेत्रात कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रात ब्लू स्टार अथलेटिक असोसिएशन अक्कलकोट या संस्थेत सचिव पद सांभाळले आहे.त्यानंतर विश्वकर्मा युवक संघटना अक्कलकोट या संघटनेत उपाध्यक्षपद सांभाळत समाज व सामाजिक कार्य केले आहे. रिपब्लिकन सेना आनंदराजे आंबेडकर यांच्या संघटनेत सोलापूर जिल्हा सचिव पदावरून त्यांनी समाजकार्य केले आहे.
सध्या ते सोलापूर येथे वास्तव्यास आहेत सोलापूर सिक्युरिटी एजन्सी असोसिएशन सोलापूर या संस्थेत सचिव या पदांनी कार्य करीत आहेत तसेच भारतीय पांचाळ संघटना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष पांचाळ समाजाचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रात करीत आहेत.ओबीसी हक्क परिषद दिल्ली या संस्थेत महाराष्ट्र प्रदेश संघटक तर सोनार हक्क परिषद या संघटनेत महाराष्ट्र राज्य सचिव म्हणून ते काम पाहत आहेत अशा विविध सामाजिक व राजकीय पटलावर त्यानी काम केले आहे या कामाची दखल घेऊन घेऊन भारतीय जनता पार्टीने व्यापारी आघाडी प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य या पदावर निवड केली आहे. या निवडी बद्दल सोलापूर जिल्ह्यातील विविध समाजिक , राजकीय बांधवांनी शुभेच्छा व अभिनंदन केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता