पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती...

*संबंधित नागरिकांनी बैठकामध्ये सक्रिय सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन*
दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत नियुक्त केलेले तीन उपजिल्हाधिकारी नागरिकांशी चर्चा करणार

सोलापूर, 19 जुलै – 
पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्यासाठी तसेच शासनाकडून कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे याची माहिती देण्यासाठी दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत बैठका आयोजित केल्या जात आहेत. या बैठका घेण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली असून सर्व समावेशक चर्चा होण्यासाठी नागरिकांनी सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
     भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी सीमा होळकर व जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे या तीन  उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती पंढरपूर कॉरिडॉर अनुषंगाने संबंधित नागरिकांशी सर्व समावेशक चर्चा करून नागरिकांच्या मागण्या सूचना व अपेक्षा यांची माहिती जाणून घेणार आहे तसेच शासन त्यांना या अंतर्गत कशा पद्धतीने मदत करू शकते याविषयी सांगितले जाणार आहे.
संबंधित अधिकारी दररोज 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी चर्चा करतील. तरी पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत ज्या नागरिक, व्यापारी व व्यावसयिक यांचा संबंध येणार आहे अशा सर्व नागरिकांनी अशा बैठकामध्ये उपस्थित राहून सहकार्य करावे. नियुक्त केलेले अधिकारी हे उपरोक्त कालावधीत पंढरपूर  येथे थांबून कामकाज करतील.


कोट -
      " पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने दिनांक 1 ते 3 मे 2025 या कालावधीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर येथे सर्व संबंधित नागरिकांच्या बैठका घेऊन चर्चा केलेली होती व त्या चर्चेमध्ये या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी सर्वांना विचारात घेऊनच जाऊ असा शब्द प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 जुलै ते 5 ऑगस्ट 2025 या कालावधीत नियुक्त केलेले तीन उपजिल्हाधिकारी 25 ते 30 नागरिकांच्या गटाशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येणार आहे. तरी उपरोक्त कालावधीत सर्व संबंधित नागरिकांनी बैठकामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करतो."
     - श्री. कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी, सोलापूर 
               *******

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form