राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सारथी फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

पंढरपूर प्रतिनिधी- 
राजमाता प्रतिष्ठान, पंढरपूर संचलित ज्ञान प्रबोधनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सारथी फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व सर्व समाजांच्या सामाजिक उन्नतीसाठी आपले जीवन वेचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेत शैक्षणिक,
सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक, राजकीय क्षेत्रात शेतकरी व प्रजेच्या हितासाठी मोलाचे कार्य केले. त्यांच्या या योगदानामुळे प्रत्येक ठिकाणी सामाजिक जाणिवेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे नाव घेतले जाते.अशा महान कार्य करणाऱ्या लोकराज्याच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व हार अर्पण पंढरपूर पत्रकार संघ अध्यक्ष संजय कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे, अपराजित सर्वगोड,विकास पवार,सोहम जयस्वाल, विनोद पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सारथी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सतीश आप्पा माने, उपाध्यक्ष सागर कदम, सचिव गणेश शिंदे, सदस्य नवनाथ बाबर, सोपान काका देशमुख, शेखरभोसले, विठ्ठल भुमकर,निलेश कदम, जितेंद्र काळे, धैर्यशील माने, भोसले, विद्यालयाचे मुख्याध्यापक पोरे तसेच शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form