स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी सूर्यकांत कडबगावकर तर शहर अध्यक्ष पदी मिराबाई बुद्रुक यांची निवड जाहीर

अक्कलकोट प्रतिनिधी --
स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना अक्कलकोट तालुका अध्यक्ष पदी प्रा. सूर्यकांत महादेवप्पा कडबगावकर तर शहर अध्यक्ष पदी श्रीमती मिराबाई कुंडलिक बुद्रुक यांची नियुक्ती स्वराज्य चे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी केली आहे, या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
    स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दिपकजी कांबळे, संस्थापक महासचिव श्री कमलेशजी शेवाळे ( देवा सर), प्रदेश अध्यक्ष सौ. धनश्री उत्पात, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, विश्वस्त उमेश काशीकर यांच्या आदेशानुसार 
     सावरकर चौक येथील कालिका निवास येथे स्वराज्य ची जिल्हा मिटिंग मध्ये  जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत वेदपाठक यांनी वरील नियुक्ती जाहीर करून कडबगावकर व बुद्रुक यांना नियुक्तीचे पत्र दिले आणि त्यांचा सत्कार केला.
    प्रा. सूर्यकांत कडबगाकर व मिराबाई बुद्रुक यांच्या निवडीचे माजी गृहराज्यमंत्री सिद्दाराम म्हेत्रे, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय देशमुख, लायन्स चे माजी प्रांतपाल राजशेखर कापसे आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलेआहे.
   या प्रसंगी गौरीशंकर चनशेट्टी, सौ. वर्षाताई चव्हाण,सौ. सुलोचना कडबगाकर शिवलिंगप्पा संगापुरे, दिपक पोतदार,  अप्पासाहेब धुमाळ, आकाश वेदपाठक, सुभाष गडसिंग सह बहुसंख्य मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form