भीमा बस स्थानक येथे तीन वॉटरप्रूफ मंडप, ३०० सुलभ शौचालयाची उपलब्धता - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद *२८ जून पासून नवीन बसस्थानक राहणार बंद*


  
पंढरपूर (दि.१३)-
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दि.६जुलै २०२५ रोजी असून, यात्रा कालावधी २६ जून ते १० जुलै असा आहे.आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून  मोठ्या प्रमाणात भाविक एसटी बसने येत असतात. एसटी बसने येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी भीमा बस स्थानक येथे पाच हजार चौरस फुटाचे तीन   वॉटरप्रूफ मंडप व ३०० सुलभ शौचालय  उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
     येळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले,  आषाढी यात्रा कालावधीसाठी एसटी बसने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी तात्पुरते चार बस स्थानक उभारले जातात. भीमा बस स्थानक येथे छत्रपती संभाजी नगर, नागपूर व अमरावती लांब पल्ल्याच्या बसेस या विभागातून येतात . भीमा बस स्थानक येथे बसेसने येणाऱ्या भाविकांसाठी जिल्हा परिषदेकडून ५ हजार चौरस फुटाचे तीन वॉटरप्रूफ मंडप, तसेच  २२५ सुलभ शौचालय व राज्य परिवहन महामंडळाकडून ७५ शौचालय उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बस स्थानकावर मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छता आदी सुविधा एसटी महामंडळाने भाविकांसाठी उपलब्ध कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. 
        
 *28 जून पासून नवीन बस स्थानक राहणार बंद*
  
  आषाढी  यात्रेसाठी पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या दिंड्यांना तसेच  वारकरी, भाविकांना वाहतुकीचा कोणताही त्रास होऊ नये. तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पंढरपूर येथे सुरू असलेले नवीन बस स्थानक 28 जून पासून यात्रा कालावधी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form